शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! विक्षिप्त परिचारकाने केली 106 रुणांची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 23:02 IST

वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना देवदूताची उपमा दिली जाते. पण या क्षेत्रामध्येही काही विकृतीही वावरत असतात. अशीच एक धक्का देणारी घटना...

 बर्लिन - वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना देवदूताची उपमा दिली जाते. पण या क्षेत्रामध्येही काही विकृतीही वावरत असतात. अशीच एक धक्का देणारी घटना जर्मनीमध्ये उघडकीस आली आहे. जर्मनीमध्ये औषधांचे अधिक डोस देऊन एका परिचारकाने (ब्रदर) 106 रुग्णांचा जीव घेतल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, अजून काही मृतदेहांची तपासणी सुरू असल्याने या प्रकारामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या वाढू शकते, अशी भीती तपासकर्त्यांनी व्यक्त केली आहे. नील्स होजेल नामक 41 वर्षीय परिचारकाला 2015 साली केलेल्या दोन हत्यांच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. तसेच होजेलवर उत्तरी ब्रोमेनमधील एका रुग्णालयात आयसीयूमध्ये असलेल्या चार रुग्णांच्या हत्येचा आरोप आहे. पोलिसांनी ऑगस्ट महिन्यांत सांगितले होते की, होजेलने सुमारे 90 रुग्णांची हत्या केली आहे. या हत्यांपैकी बहुतांश प्रकरणांची चौकशी पूर्ण झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच होजेलला 16 हत्यांप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. 1999 पासून 2005 पर्यंत होजेल दोन स्थानिक रुग्णालयांमध्ये परिचारक होता. याचदरम्यान त्याने या हत्या केल्या.   ओल्डेनबर्गमध्ये सरकारी पक्षाने सांगितले की, पुढील वर्षी होजेल याच्यावर अजून काही आरोप ठेवण्यात येणार आहेत. होजेल हा रुग्णाना जाणूनबुजून औषधांचा अधिक डोस देत असे. ज्यामुळे रुग्णांना हृदयविकाराचा झटका येत असे वा त्यांच्या शरीरातील एकेक अवयव निकामी होत असत. कहर म्हणजे यानंतर तो त्या रुग्णांवर उपचार करायचा आणि त्यातून  एकादा रुग्ण वाचलाच तर वरिष्ठांकडून त्याचे कौतुक होऊन नावलौकिक व्हायचा.  जर्मनीच्या इतिहासामधील ही एक विचित्र घटना आहे. होजेलच्या या कृत्यामुळे चिंताजनक परिस्थितीमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांला स्वास्थ लाभावे अशी प्रार्थना पोलिसांनी केली आहे. तसेच होजेलला आपण औषधांचा अतिरिक्त डोस किती रुग्णांना दिला हे माहित नाही. मात्र असे 30 वेळा घडल्याचे त्याने सांगितल्याचे या प्रकरणाचा तपास करणाऱ्यांनी सांगितले आहे.  

टॅग्स :hospitalहॉस्पिटल