सोमालियाजवळ जहाज हायजॅक, १५ भारतीय क्रू मेंबर अडकले; युद्धनौका रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 12:56 PM2024-01-05T12:56:02+5:302024-01-05T12:56:29+5:30

एमव्ही लीला नॉरफॉक असे या जहाजाचे  नाव असून सोमालियाच्या समुद्री सीमेजवळच या जहाजावर समुद्री चाच्यांनी ताबा मिळविला आहे.

Ship hijacked off Somalia, 15 Indian crew members stranded; Warships depart | सोमालियाजवळ जहाज हायजॅक, १५ भारतीय क्रू मेंबर अडकले; युद्धनौका रवाना

सोमालियाजवळ जहाज हायजॅक, १५ भारतीय क्रू मेंबर अडकले; युद्धनौका रवाना

काही दिवसांपूर्वी भारतीय जहाजावर ड्रोन हल्ला झाला होता. आता सोमालियाजवळ एक जहाज हायजॅक करण्यात आले आहे. यामध्ये १५ भारतीय क्रू मेंबर असून नौदलाच्या युद्धनौकेला तिकडे रवाना करण्यात आले आहे. 

एमव्ही लीला नॉरफॉक असे या जहाजाचे  नाव असून सोमालियाच्या समुद्री सीमेजवळच या जहाजावर समुद्री चाच्यांनी ताबा मिळविला आहे. या जहाजावर सध्या लायबेरियाचा झेंडा फडकत आहे. गुरुवारी सायंकाळी जहाज हायजॅक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

नौदलाने या जहाजाला घेरले असून हेलिकॉप्टरद्वारे यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच जहाजावरील क्रू मेंबरसोबत संपर्क साधण्यात आला आहे. सर्वजण आत सुरक्षित आहेत. सोमालिया हे समुद्री लुटारुंचे हब आहे. 

काही काळापूर्वीच या लुटारुंनी अरबी समुद्रात माल्टाचे एमव्ही रुएन हे जहाज हायजॅक केले होते. तेव्हाही भारती नौदलाने युद्धानौका पाठविली होती. विमानांद्वारे पाळत ठेवण्यात आली होती. अखेर हे जहाज चाच्यांच्या तावडीतून सोडविण्यात आले होते. 
 

Web Title: Ship hijacked off Somalia, 15 Indian crew members stranded; Warships depart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.