तस्करांनी जहाज बुडविले, 500 मृत्युमुखी

By Admin | Updated: September 16, 2014 01:57 IST2014-09-16T01:57:08+5:302014-09-16T01:57:08+5:30

तस्करांनी भूमध्य समुद्रात आपले जहाज प्रवासी जहाजावर धडकवून बुडविल्यामुळे किमान 500 जण बुडून मरण पावल्याचे वृत्त आहे.

The ship drowned by the smugglers, 500 dead | तस्करांनी जहाज बुडविले, 500 मृत्युमुखी

तस्करांनी जहाज बुडविले, 500 मृत्युमुखी

रोम : तस्करांनी भूमध्य समुद्रात आपले जहाज प्रवासी जहाजावर धडकवून बुडविल्यामुळे किमान 500 जण बुडून मरण पावल्याचे वृत्त आहे. तथापि, या घटनेला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
इंटरनॅशनल ऑर्गनायङोशन फॉर मायग्रेशनने (आयओएम) या दुर्घटनेतून वाचलेल्या दोन पॅलेस्टिनींचा हवाला देऊन सोमवारी हे वृत्त दिले. माल्टा येथे गुरुवारी जहाज बुडविण्यात आल्यानंतर दुस:या मालवाहू 
जहाजाने या दोन पॅलेस्टिनींना वाचविले. 
या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार तस्करांनी बुडविलेल्या त्या जहाजावर किमान 5क्क् लोक होते. इटलीत आयओएमचे प्रवक्ते फ्लावियो डी गियाकोमो यांनी ‘एएफपी’ ला सांगितले की, जिवंत राहिलेल्या दोन जणांना सिसिली येथे आणण्यात आले. 
त्या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार त्या जहाजावर 5क्क् लोक होते. इतर 9 जणांना युनान व माल्टाच्या जहाजांनी वाचविले व राहिलेले मरण पावले. अवैध स्थलांतराच्या प्रयत्नात अनेकदा जलदुर्घटना होतात. (वृत्तसंस्था)
 
प्रवाशांनी छोटय़ा नावेला नकार दिल्यामुळे चिडून कृत्य
4जहाजावर सिरिया, पॅलेस्टिन, इजिप्त आणि सुदानचे नागरिक होते. हे जहाज 6 सप्टेंबर रोजी इजिप्तच्या डेमिएटा येथून निघाले होते. युरोपला जाण्याच्या प्रयत्नांत त्यांना अनेक वेळा जहाज बदलावे लागले होते. दुस:या जहाजावर असलेल्या तस्करांनी त्यांना दुस:या छोटय़ा नावेत जायला सांगितले. 
4ही नाव एवढी छोटी होती, की ती एवढय़ा मोठय़ा संख्येतील प्रवाशांचे वजन सहन करू शकणारच नव्हती. प्रवाशांनी त्या छोटय़ा नावेत जायला नकार देताच रागावलेल्या तस्करांनी ते जहाज बुडेर्पयत त्याला धडका दिल्या. इटलीचे पोलीस या घटनेची चौकशी करीत आहेत.

 

Web Title: The ship drowned by the smugglers, 500 dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.