शहरं
Join us  
Trending Stories
1
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
2
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
3
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
4
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
5
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
6
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
7
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
8
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह
9
बिहार निवडणूक २०२५: दुसऱ्या टप्प्यात १२२ जागा, १३०२ जण रिंगणात; १३७२ उमेदवारांचे अर्ज वैध
10
भारतीय कंपन्या रशियन तेलाची खरेदी घटवणार; अमेरिकेकडून वाढवणार, तज्ज्ञांची माहिती
11
भारतातून ३०० कोटींच्या शेणाची निर्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात गायीच्या शेणाला मागणी
12
अमेरिकन कामगारांवर अन्याय, एच-१बी व्हिसा शुल्क विरुद्धचे खटले लढू; ट्रम्प प्रशासनाचा निर्धार
13
२५० कोटी व्याजासह जमा करा तरच म्हणणे ऐकू! मुंबई मेट्रोची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
14
झुबीनचा मृत्यू कशामुळे? सिंगापूर पोलिस देणार पुरावे, CCTV फुटेज अन् जबाब दहा दिवसांत मिळणार
15
वायुप्रदूषणामुळे भारतात २०२३ मध्ये झाले २० लाख मृत्यू, संशोधन अहवालातील माहिती
16
इस्लामाबाद पोलीस एसपी होते भारताचे गुप्तहेर?; रहस्यमय मृत्यूनंतर सोशल मीडियात चर्चेला उधाण
17
२००२ मध्ये भारत-पाक युद्ध होणार होते?; माजी CIA एजेंटचा मुशर्रफ यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा
18
राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंगनं बाजी पलटली; २८ आमदार असताना भाजपानं ३२ मते कशी मिळवली?
19
IND vs AUS 3rd ODI Live Streaming : टीम इंडियासमोर 'व्हाइट वॉश' टाळण्याचं आव्हान
20
'मोदीज मिशन' पुस्तकातील काही भाग शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा; एकनाथ शिंदेंची मागणी

पाकिस्तानला 'ही' चूक महागात पडणार; PoK भारतात विलीन करण्याचा मार्ग झाला मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:09 IST

Shimla Agreement Deal: १९७२ च्या शिमला करारानुसार हा भाग पाकिस्तानला देण्यात आला होता.

Pakistan On Shimla Agreement Deal: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानावर जोरदार प्रहार केला. या कारवाईत पाकिस्तानासह पीओकेमधील ९ दहशतवादी अड्डे नष्ट करण्यात आले. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले सुरू केले. ४ दिवस चाललेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धविराम जाहीर झाला. पण, यादरम्यान पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारत आणि पाकमधील १९७२ चा शिमला करार पूर्णपणे संपल्याची घोषणा केली होती. 

२२ एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार थांबवला होता, त्यानंतर पाकिस्तानने शिमला करार स्थगित केला. यासोबतच पाकिस्तानी संरक्षण मंत्री म्हणाले होते की, भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती पूर्वीसारखीच झाली आहे. आता नियंत्रण रेषा (एलओसी) युद्धविराम रेषा मानली पाहिजे. तसेच, शिमला करार संपल्याचे घोषित करताना पाकिस्तानी संरक्षण मंत्री म्हणाले की, आता पाकिस्तान भारत-पाकिस्तान वाद द्विपक्षीय ऐवजी बहुपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मार्गाने उपस्थित केला जाईल.

भारताकडे एक उत्तम संधी दरम्यान, शिमला करार संपुष्टात आणण्याच्या घोषणेचा पाकिस्तानवरच सर्वात वाईट परिणाम होऊ शकतो. कारण, १९७१ च्या भारत आणि पाकिस्तानमधील युद्धादरम्यान पाकिस्तानने काश्मीरमधील चुंब शहर ताब्यात घेतले होते, जे स्वातंत्र्यापासून भारताचा भाग होते. १९७२ च्या शिमला करारानुसार या शहरावर पाकिस्तानचे नियंत्रण कायम ठेवण्यात आले.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चुंब महत्वाचे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चुंब क्षेत्र खूप महत्वाचे आहे. १९४९ च्या युद्धविराम करारानुसार चुंबदेखील भारताचा एक भाग होता, परंतु १९६५ च्या युद्धादरम्यान पाकिस्तानने चुंबवर कब्जा केला. युद्धानंतर चुंब पुन्हा भारताच्या ताब्यात आले, परंतु १९७१ मध्ये पाकिस्तानने पुन्हा चुंबवर कब्जा केला. पुढे १९७२ च्या शिमला करारानुसार हे शहर पाकिस्तानचा भाग झाले. पुढे पाकिस्तानने चुंबचे नाव बदलून इफ्तिकाराबाद केले. पाकिस्तानने शहरावर कब्जा केल्यानंतर चुंबमध्ये राहणारी कुटुंबे भारतात स्थलांतरित झाली.

पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचा दावाआज चुंब हा पाकव्याप्त काश्मीरचा भाग आहे, परंतु ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी १९७२ चा शिमला करार संपल्याचे जाहीर केले आहे, त्यामुळे भारतीय सैन्याकडे चुंब पुन्हा भारतात जोडण्याचा पर्याय आहे. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPOK - pak occupied kashmirपीओकेIndiaभारत