शेख हसीना यांचे घरही हिसकावून घेतले, बांगलादेशात मोठी कारवाई; बहिणीपासून मुलापर्यंत, सर्वांची मालमत्ता जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 09:14 IST2025-03-12T09:11:02+5:302025-03-12T09:14:32+5:30

बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे.

Sheikh Hasina's house was also snatched, big action in Bangladesh; From sister to son, everyone's property seized | शेख हसीना यांचे घरही हिसकावून घेतले, बांगलादेशात मोठी कारवाई; बहिणीपासून मुलापर्यंत, सर्वांची मालमत्ता जप्त

शेख हसीना यांचे घरही हिसकावून घेतले, बांगलादेशात मोठी कारवाई; बहिणीपासून मुलापर्यंत, सर्वांची मालमत्ता जप्त

बांगलादेशमध्ये माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. न्यायालयाने त्यांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आणि त्यांच्या नातेवाईकांची बँक खाती सील करण्याचे आदेश दिले आहेत. शेख हसीना यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या मुलासह त्यांच्या अनेक नातेवाईकांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

पाकिस्तान ट्रेन हायजॅक: लष्कराचा १०४ जणांना वाचविल्याचा दावा, बलुच आर्मीचा सोडल्याचा दावा 

ढाका येथील न्यायालयाने हसीना यांचे धनमोंडी येथील निवासस्थान 'सुधासदन' आणि इतर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, न्यायालयाने त्यांच्या कुटुंबाशी जोडलेली १२४ बँक खाती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारी ढाका महानगर वरिष्ठ विशेष न्यायाधीश झाकीर हुसेन गालिब यांनी हे आदेश जारी केले.

भ्रष्टाचार विरोधी आयोगाने दाखल केलेल्या अर्जानंतर न्यायालयाने शेख हसीना आणि त्यांच्या नातेवाईकांविरुद्ध ही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने त्यांचा मुलगा सजीब वाजेद जॉय, मुलगी सायमा वाजेद पुतुल, बहीण शेख रेहाना आणि त्यांच्या मुली ट्यूलिप सिद्दीकी आणि रदवान मुजीब सिद्दीकी यांच्या मालकीच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले.

बांगलादेशातील हिंसाचार

गेल्या वर्षी बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे निदर्शने झाली यामुळे ५ ऑगस्ट रोजी १५ वर्षांहून अधिक काळ सत्तेत असलेल्या शेख हसीना यांच्या सरकारला पदच्युत करण्यात आले. तीन दिवसांनंतर, मोहम्मद युनूस यांनी अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार म्हणून पदभार स्वीकारला.

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार प्रमुख वोल्कर तुर्क यांनी म्हणाले होते की,  जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये विद्यार्थ्यांच्या निदर्शनांदरम्यान हिंसाचार झाल्यास बांगलादेशच्या लष्कराला संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमधून बंदी घातली जाईल, असा इशारा जागतिक संस्थेने दिला होता.

Web Title: Sheikh Hasina's house was also snatched, big action in Bangladesh; From sister to son, everyone's property seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.