शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शेख हसीना यांना १० वर्षांचा तुरुंगवास, तर ब्रिटिश खासदार ट्यूलिप सिद्दीक यांनाही शिक्षा; काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 15:58 IST

ढाका येथील एका विशेष न्यायालयाने 'पूर्बाचल प्लॉट घोटाळा' प्रकरणात शेख हसीना यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ढाका येथील एका विशेष न्यायालयाने 'पूर्बाचल प्लॉट घोटाळा' प्रकरणात शेख हसीना यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे, या घोटाळ्यात केवळ हसीनाच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही दणका बसला असून, त्यांची भाची आणि ब्रिटिश खासदार ट्यूलिप सिद्दीक यांना ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.

नेमके प्रकरण काय आहे?

हा संपूर्ण खटला पूर्बाचल न्यू टाउन प्रोजेक्टमधील भूखंड वाटपाशी संबंधित आहे. भ्रष्टाचारविरोधी आयोगाने आरोप केला होता की, शेख हसीना यांनी सत्तेचा गैरवापर करत आणि सरकारी अधिकाऱ्यांशी संगनमत करून नियमांना हरताळ फासला. या प्रकल्पातील सेक्टर २७ मधील 'डिप्लोमॅटिक झोन'मध्ये स्वतःसाठी आणि आपल्या नातेवाईकांसाठी प्रत्येकी १० कट्ठाचे ६ भूखंड बेकायदेशीरपणे लाटले होते. विशेष म्हणजे, हे सर्व सदस्य या भूखंडांसाठी पात्र नसतानाही त्यांना हे वाटप करण्यात आले होते.

कुटुंबासह अधिकाऱ्यांवरही गाजली कुऱ्हाड

न्यायाधीश मोहम्मद रबीउल आलम यांनी या प्रकरणात केवळ हसीना यांनाच नाही, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला दोषी धरले आहे. हसीना यांची दुसरी भाची अजमीना सिद्दीक आणि पुतण्या राडवान मुजीब सिद्दीक बॉबी यांनाही ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यासोबतच १ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास भोगावा लागणार आहे.

या घोटाळ्यात केवळ राजकीय नेतेच नाही, तर तत्कालीन बड्या अधिकाऱ्यांचाही समावेश होता. न्यायालयाने माजी गृहनिर्माण मंत्री शरीफ अहमद, माजी सचिव आणि राजुकच्या अनेक माजी अध्यक्षांसह एकूण ११ जणांना १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

जलदगतीने चालला खटला

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, अवघ्या १५ सुनावणींमध्ये हा खटला पूर्ण करण्यात आला. यामध्ये ३९ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या, ज्यात भ्रष्टाचारविरोधी आयोगाचे अधिकारी आणि गृहनिर्माण मंत्रालयातील वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

शेख हसीना यांच्यासाठी हा पहिलाच धक्का नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही त्यांना भ्रष्टाचाराच्या चार वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एकूण २६ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता या नवीन निकालामुळे हसीना आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या राजकीय भविष्यासमोर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sheikh Hasina sentenced; British MP Tulip Siddiq also implicated in scandal.

Web Summary : Sheikh Hasina faces 10 years jail in land scam; niece, British MP Tulip Siddiq, gets 4 years. The case involves illegal land allocation in Dhaka. Several officials and family members also convicted, facing imprisonment and fines. This adds to Hasina's existing corruption convictions.
टॅग्स :BangladeshबांगलादेशInternationalआंतरराष्ट्रीय