Shashi Tharoor On India-Pakistan Relations:ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानेपाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी छावण्यांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकला जागतिक पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याच अनुषंगाने काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय भारतीय शिष्टमंडळाने अमेरिकेचा दौरा सुरू केला. या शिष्टमंडळाने न्यू यॉर्कमधील 9/11 स्मारकापासून आपला दौरा सुरू केला. दहशतवाद ही एक जागतिक समस्या आहे आणि जागतिक पातळीवर एकत्रितपणे त्याला प्रतिसाद देण्याची गरज आहे, हे दर्शविणारा हा एक प्रतीकात्मक आणि भावनिक इशारा होता.
न्यू यॉर्कमधील भारतीय दूतावासात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना थरूर म्हणाले की, आम्ही मैत्रीचा हात पुढे केला, पण बदल्यात दहशतवादी हल्ले झाले. पंतप्रधान मोदी पाकिस्तानला भेट देण्याच्या काही आठवड्यांपूर्वी जानेवारी 2016 मध्ये पठाणकोट हवाई तळावर हल्ला झाला होता. आम्ही वारंवार मैत्रीचा हात पुढे केला आहे, पण आम्हाला प्रतिसादात दहशतवाद मिळाला आहे. थरूर यांनी मुंबई हल्ल्यांचाही उल्लेख केला, ज्यामध्ये हल्लेखोरांना पाकिस्तानस्थित हँडलर्सकडून थेट सूचना मिळत होत्या. ते म्हणाले की, हे सर्व पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद धोरणाचे स्पष्ट उदाहरण आहे.
अमेरिकेला पाकिस्तानचा खरा चेहरा दाखवलाशशी थरूर यांनी अमेरिकन जनतेला आठवण करून दिली की, ज्याप्रमाणे अमेरिकेने 'ऑपरेशन नेपच्यून स्पियर' अंतर्गत ओसामा बिन लादेनला मारले, त्याचप्रमाणे भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवादी तळांना लक्ष्य केले आहे. लष्करी छावणीजवळ लपून बसलेल्या ओसामाला पाकिस्तानने आश्रय दिल्याचेही त्यांनी सांगितले. यावरून हे स्पष्ट होते की दहशतवादाविरुद्ध पाकिस्तानची वचनबद्धता केवळ एक भ्रम आहे.
भारताचा नवीन दृष्टिकोनअमेरिकेत झालेल्या पत्रकार परिषदेत थरूर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, आम्ही आंतरराष्ट्रीय कागदपत्रे आणि पुरावे दिले, पण पाकिस्तानने ते नाकारले. आता आम्ही संदेश स्पष्ट केला आहे की, जर तुम्ही हल्ला केला, तर तुम्हाला अचूक आणि जोरदार प्रत्युत्तर मिळेल. या