शरीफ, मंत्र्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा

By Admin | Updated: September 18, 2014 02:13 IST2014-09-18T02:13:14+5:302014-09-18T02:13:14+5:30

येथील सरकारविरोधी निदर्शकांच्या हत्येत कथित सहभागावरून पंतप्रधान नवाज शरीफ, त्यांचे मंत्री व इतर वरिष्ठ अधिका:यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Sharif, murder case against ministers | शरीफ, मंत्र्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा

शरीफ, मंत्र्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा

इस्लामाबाद : येथील सरकारविरोधी निदर्शकांच्या हत्येत कथित सहभागावरून पंतप्रधान नवाज शरीफ, त्यांचे मंत्री व इतर वरिष्ठ अधिका:यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. 
निदर्शकांच्या हत्येप्रकरणी शरीफ आणि इतरांविरुद्ध खुनाचा दुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी दिल्यानंतर मंगळवारी रात्री हा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल केला जावा याकरिता पाकिस्तान अवामी तहरिकचे नेते मौलवी ताहिर उल कादरी यांनी न्यायालयात धाव घेतली होती. 
3क् ऑगस्ट रोजी मौलवी कादरी आणि पाकिस्तान तहरिक ए इन्साफचे प्रमुख इम्रान खान यांच्या समर्थकांची पोलिसांशी चकमक होऊन तीन ठार तर 5क्क् जण जखमी झाले होते. निदर्शक शरीफ यांच्या सरकारी निवासस्थानावर मार्च काढत असताना हा संघर्ष झाला होता. 
कादरी यांनी दाखल केलेली याचिका निकाली काढताना जिल्हा व सत्र न्यायाधिशांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल केला, असे सचिवालयातील पोलीस अधिका:याने सांगितले. 
या प्रकरणात पाकिस्तान दंडसंहितेच्या कलम 3क्2 शिवाय दहशतवाद प्रतिबंधक कायद्याचे कलम सातही अंतभरूत करण्यात 
आले आहे, असे हा अधिकारी म्हणाला. शरीफ यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल होण्याची ही दुसरी वेळ आहे. 
जूनमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत कादरींचे 14 कार्यकर्ते मारले गेले होते. त्यावरून गेल्या महिन्यात लाहोरमध्ये त्यांच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला होता. (वृत्तसंस्था) 

 

Web Title: Sharif, murder case against ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.