शरीफ अब्जाधीश

By Admin | Updated: January 10, 2015 00:05 IST2015-01-10T00:05:12+5:302015-01-10T00:05:12+5:30

पाकिस्तानात पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह अनेक मंत्री व संसद सदस्य अब्जाधीश आहेत. शरीफ यांच्याकडे दोन अब्ज रुपयांहून अधिक मालमत्ता आहे.

Sharif Billionaire | शरीफ अब्जाधीश

शरीफ अब्जाधीश

इस्लामाबाद : लाखो लोक दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत असलेल्या पाकिस्तानात पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह अनेक मंत्री व संसद सदस्य अब्जाधीश आहेत. शरीफ यांच्याकडे दोन अब्ज रुपयांहून अधिक मालमत्ता आहे.
शरीफ यांनी पाकिस्तान निवडणूक आयोगाला २०१४-२०१५ वर्षासाठी सादर केलेल्या निवेदनानुसार, ते आणि त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या मालमत्तेचे एकूण मूल्य वाढून १.७१ अब्ज रुपयांहून २.३६ अब्ज रुपये झाले आहे. हुदायबिया इंजिनिअरिंग कंपनी, हुदायबिया पेपर मिल्स, मोहंमद बक्श टेक्स्टाईल आणि रमजान स्पिनिंग मील्समधील त्यांचे भागभांडवल आहे तसेच राहिले; मात्र चौधरी शुगर मिल्समधील त्यांच्या गुंतवणुकीत ६०० टक्के वाढ झाली. गेल्या वर्षी त्यांची या कंपनीतील गुंतवणूक २० दशलक्ष रुपये होती. (वृत्तसंस्था)

Web Title: Sharif Billionaire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.