शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

ऑस्कर नामांकनांच्या यादीत ‘शेप ऑफ वॉटर’ची बाजी, 13 नामांकने 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 13:46 IST

जगभरातील अनेक  सिनेरसिकांचे लक्ष लागलेल्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. या जाहीर केलेल्या नामांकनांच्या यादीत दिग्दर्शक गिआर्मो डेल टोरो यांच्या 'शेप ऑफ वॉटर' चित्रपटाला यंदा ऑस्करची सर्वाधिक 13 नामांकने मिळाली आहेत.

लॉस अँजेलिस: जगभरातील अनेक  सिनेरसिकांचे लक्ष लागलेल्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. या जाहीर केलेल्या नामांकनांच्या यादीत दिग्दर्शक गिआर्मो डेल टोरो यांच्या 'शेप ऑफ वॉटर' चित्रपटाला यंदा ऑस्करची सर्वाधिक 13 नामांकने मिळाली आहेत. या वर्षीच्या  90व्या अकादमी अवॉर्डससाठी एकूण नऊ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. येत्या 4 मार्च रोजी लॉस अँजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये हा पुरस्कार सोहळा रंगणार असून, या सोहळ्याचे सूत्रसंचालन जिम्मी किम्मेल करणार असल्याचे समजते‘शेप ऑफ वॉटर’ सोबत ख्रिस्तोफर नोलन यांचा युद्धपट ‘डंकर्क’, गोल्डन ग्लोबमध्ये महत्त्वाचे पुरस्कार पटकावलेला ‘थ्री बिलबोर्ड आऊटसाइड एबिंग, मिझूरी’, स्टीवन स्पीलबर्ग दिग्दर्शित ‘द पोस्ट’ यासोबत ‘फॅण्टम थ्रेड’, ‘डार्केस्ट अवर’, ‘द पोस्ट’, ‘गेट आऊट’, ‘कॉल मी बाय युवर नेम’ , ‘लेडी बर्ड’ हे चित्रपटही यंदा ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत आहेत. विशेष म्हणजे, ‘द पोस्ट’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मेरिल स्ट्रीप यांच्या भूमिकेला नामांकन मिळाले असून ऑस्करसाठी हे त्यांचे एकविसावे नामांकन आहे.

 

ऑस्कर पुरस्कारांसाठी नामांकने खालीलप्रमाणे...                                

सर्वोत्कृष्ट चित्रपटकॉल मी बाय युअर नेमडार्केस्ट आवरडंकर्कगेट आऊटलेडी बर्डफँटम थ्रेडद पोस्टद शेप ऑफ वॉटरथ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनख्रिस्तोफर नोलान (डंक्रिक)जॉर्डन पीले (गेट आऊट)ग्रेटा गेरविग (लेडी बर्ड)पॉल थॉमस अँडरसन (फँटम थ्रेड)गिलर्मो डेल टोरो (द शेप ऑफ वॉटर)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसॅली हॉकिन्स (द शेप ऑफ वॉटर)फ्रान्सेस मॅकडोर्मंड (थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी)मार्गो रॉबी (आय टोन्या)साईरसे रोणान (लेडी बर्ड)मेरिल स्ट्रीप (द पोस्ट)

सर्वोत्कृष्ट अभिनेताटिमोथी चलामेट (कॉल मी बाय युअर नेम)डॅनिअल डे-लिवाईस (फँटम थ्रेड)गॅरी ओल्डमॅन (डार्केस्ट आवर)डॅन्झेल वॉशिंग्टन (रोमन जे. इस्रायल, इएसक्यू)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीमेरी जे. ब्लिज (मडबाऊंड)अॅलिसन जेनी (आय टोन्या)सेस्ली मॅनविले (फँटम थ्रेड)लॉरी मेटकाल्फ (लेडी बर्ड)ओक्टाविया स्पेन्सर (द शेप ऑफ वॉटर)

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेताविलिएम डफो (द फ्लोरिडा प्रोजेक्ट)वूडी हारेलसन (थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड इबिंग, मिझूरी)रिचर्ड जेनकिन्स (ऑल द मनी इन द वर्ल्ड)सैम रॉकवेल (थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड इबिंग, मझूरी)

टॅग्स :Oscar nominationsऑस्कर नामांकनेOscars 2018ऑस्कर अवॉर्ड्स २०१८