Shape of water bet on the Oscars, 13 nominations | ऑस्कर नामांकनांच्या यादीत ‘शेप ऑफ वॉटर’ची बाजी, 13 नामांकने 

ऑस्कर नामांकनांच्या यादीत ‘शेप ऑफ वॉटर’ची बाजी, 13 नामांकने 

लॉस अँजेलिस: जगभरातील अनेक  सिनेरसिकांचे लक्ष लागलेल्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. या जाहीर केलेल्या नामांकनांच्या यादीत दिग्दर्शक गिआर्मो डेल टोरो यांच्या 'शेप ऑफ वॉटर' चित्रपटाला यंदा ऑस्करची सर्वाधिक 13 नामांकने मिळाली आहेत. या वर्षीच्या  90व्या अकादमी अवॉर्डससाठी एकूण नऊ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. येत्या 4 मार्च रोजी लॉस अँजेलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये हा पुरस्कार सोहळा रंगणार असून, या सोहळ्याचे सूत्रसंचालन जिम्मी किम्मेल करणार असल्याचे समजते
‘शेप ऑफ वॉटर’ सोबत ख्रिस्तोफर नोलन यांचा युद्धपट ‘डंकर्क’, गोल्डन ग्लोबमध्ये महत्त्वाचे पुरस्कार पटकावलेला ‘थ्री बिलबोर्ड आऊटसाइड एबिंग, मिझूरी’, स्टीवन स्पीलबर्ग दिग्दर्शित ‘द पोस्ट’ यासोबत ‘फॅण्टम थ्रेड’, ‘डार्केस्ट अवर’, ‘द पोस्ट’, ‘गेट आऊट’, ‘कॉल मी बाय युवर नेम’ , ‘लेडी बर्ड’ हे चित्रपटही यंदा ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत आहेत. विशेष म्हणजे, ‘द पोस्ट’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मेरिल स्ट्रीप यांच्या भूमिकेला नामांकन मिळाले असून ऑस्करसाठी हे त्यांचे एकविसावे नामांकन आहे. 

ऑस्कर पुरस्कारांसाठी नामांकने खालीलप्रमाणे...                                

सर्वोत्कृष्ट चित्रपट
कॉल मी बाय युअर नेम
डार्केस्ट आवर
डंकर्क
गेट आऊट
लेडी बर्ड
फँटम थ्रेड
द पोस्ट
द शेप ऑफ वॉटर
थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन
ख्रिस्तोफर नोलान (डंक्रिक)
जॉर्डन पीले (गेट आऊट)
ग्रेटा गेरविग (लेडी बर्ड)
पॉल थॉमस अँडरसन (फँटम थ्रेड)
गिलर्मो डेल टोरो (द शेप ऑफ वॉटर)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
सॅली हॉकिन्स (द शेप ऑफ वॉटर)
फ्रान्सेस मॅकडोर्मंड (थ्री बिलबोर्ड आऊटसाईड एबिंग, मिझूरी)
मार्गो रॉबी (आय टोन्या)
साईरसे रोणान (लेडी बर्ड)
मेरिल स्ट्रीप (द पोस्ट)

सर्वोत्कृष्ट अभिनेता
टिमोथी चलामेट (कॉल मी बाय युअर नेम)
डॅनिअल डे-लिवाईस (फँटम थ्रेड)
गॅरी ओल्डमॅन (डार्केस्ट आवर)
डॅन्झेल वॉशिंग्टन (रोमन जे. इस्रायल, इएसक्यू)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
मेरी जे. ब्लिज (मडबाऊंड)
अॅलिसन जेनी (आय टोन्या)
सेस्ली मॅनविले (फँटम थ्रेड)
लॉरी मेटकाल्फ (लेडी बर्ड)
ओक्टाविया स्पेन्सर (द शेप ऑफ वॉटर)

सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता
विलिएम डफो (द फ्लोरिडा प्रोजेक्ट)
वूडी हारेलसन (थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड इबिंग, मिझूरी)
रिचर्ड जेनकिन्स (ऑल द मनी इन द वर्ल्ड)
सैम रॉकवेल (थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड इबिंग, मझूरी)

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shape of water bet on the Oscars, 13 nominations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.