नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 21:09 IST2025-11-03T20:58:56+5:302025-11-03T21:09:19+5:30
ईशान्य नेपाळमधील यालुंग री शिखरावर झालेल्या हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. शिखराच्या बेस कॅम्पमध्ये झालेल्या दुर्घटनेत अनेक परदेशी गिर्यारोहक अडकले होते. मृतांमध्ये परदेशी आणि नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. चार जण अजूनही बेपत्ता आहेत आणि त्यांचा शोध सुरू आहे.

नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
नेपाळमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. सोमवारी ईशान्य नेपाळमध्ये एका मोठ्या हिमस्खलनात किमान सात जणांचा मृत्यू झाला. यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. ५,६३० मीटर उंचीच्या यालुंग री पर्वतावर ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, हिमस्खलन शिखराच्या बेस कॅम्पवर कोसळले, तिथे अनेक परदेशी गिर्यारोहक उपस्थित होते. चार जण अजूनही बेपत्ता आहेत आणि त्यांचा शोध सुरू आहे.
मृतांमध्ये परदेशी आणि नेपाळी नागरिकांचा समावेश
मृतांमध्ये तीन अमेरिकन, एक कॅनेडियन, एक इटालियन आणि दोन नेपाळी नागरिकांचा समावेश आहे. ही माहिती दोलखा जिल्ह्यातील जिल्हा पोलिस कार्यालयाचे पोलिस उपअधीक्षक ज्ञान कुमार महातो यांनी दिली. यालुंग री हे शिखर बागमती प्रांतातील रोलवालिंग खोऱ्यात आहे.