Sensation in America! Billionaire Donald Trump paid only Rs 55,000 in income tax | अमेरिकेत खळबळ! अब्जाधीश डोनाल्ड ट्रम्प यांनी भरला केवळ 55000 रुपये इन्कम टॅक्स

अमेरिकेत खळबळ! अब्जाधीश डोनाल्ड ट्रम्प यांनी भरला केवळ 55000 रुपये इन्कम टॅक्स

अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष निवडणूक तोंडावर आलेली असताना रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. ट्रम्प यांनी गेल्या 15 वर्षांपैकी 10 वर्षे आयकरच भरला नसल्याचे समोर आला आहे. तर धक्कादायक म्हणजे अब्जाधीश असुनही ट्रम्प यांनी 2016 आणि 2017 मध्ये केवळ 750 डॉलर कर भरला आहे. या काळात ट्रम्प यांनी 42 कोटी डॉलरची कमाई केली होती. 


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एकूण संपत्ती 2.1 अब्ज डॉलर एवढी आहे. कोरोना व्हायरसच्या संकटात त्यांच्या संपत्तीमध्ये 1 अब्ज डॉलरची घट झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून ट्रम्प यांनी त्यांचा कर भरणा सार्वजनिक केलेला नाही. एवढेच नाही तर तो लपविण्यासाठी कायदेशीर लढाऊ लढत आहेत. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार सध्या कराचे ऑडिट सुरु आहे.  न्‍यूयॉर्क टाइम्‍सनुसार ट्रम्प यांनी त्यांच्या अब्जावधींच्या व्यवसायांतून मोठे नुकसान दाखवून कर चुकविला आहे. 


ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यानुसार 2018 मध्ये त्यांना 4 कोटी 74 लाख डॉलरचे नुकसान झाले आहे. तर त्याच आर्थिक वर्षात ट्रम्प यांनी त्यांचे उत्पन्न 43 कोटी 49 लाख डॉलर एवढे प्रचंड दाखविले होते. धक्कादायक म्हणजे ट्रम्प यांनी मोठे नुकसान दाखवून 7.29 कोटी डॉलरचा टॅक्स रिफंड मिळविला होता. या करचोरीवरून ट्रम्प गेल्या दशकभरापासून कायदेशीर लढाई लढत आहेत. जर त्यांच्याविरोधात निर्णय गेल्यास त्यांना 10 कोटी डॉलरचा दंड भरावा लागण्याची शक्यता आहे. 


ही फेक न्यूज: ट्रम्प
ट्रम्प यांनी 55 हजार रुपयांचाच कर भरल्याच्या वृत्ताने अमेरिकेत खळबळ उडाली असून यावर ट्रम्प यांनी ही फेक न्यूज असल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात मी कर दिलेला आहे, तुम्ही लवकरच हा कर माझ्या परताव्यामध्ये पाहू शकणार आहात. सध्या याचे ऑडिट सुरु आहे. यासाठी खूप वेळ लागत आहे, असे ते म्हणाले. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sensation in America! Billionaire Donald Trump paid only Rs 55,000 in income tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.