सिद्धार्थ धर इसिसचा वरिष्ठ कमांडर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2016 01:50 IST2016-05-03T01:50:33+5:302016-05-03T01:50:33+5:30

नवा जिहादी जॉन व भारतीय वंशाचा दहशतवादी सिद्धार्थ धर इस्लामिक स्टेट अर्थात इसिसचा एक वरिष्ठ कमांडर आहे. इसिसने गुलाम बनविलेली याजिदी मुलगी निहद बरकतच्या हवाल्याने

Senior commander of Siddhartha Dhar Isis? | सिद्धार्थ धर इसिसचा वरिष्ठ कमांडर?

सिद्धार्थ धर इसिसचा वरिष्ठ कमांडर?

लंडन : नवा जिहादी जॉन व भारतीय वंशाचा दहशतवादी सिद्धार्थ धर इस्लामिक स्टेट अर्थात इसिसचा एक वरिष्ठ कमांडर आहे.
इसिसने गुलाम बनविलेली याजिदी मुलगी निहद बरकतच्या हवाल्याने इंडीपेंडेंटने हे वृत्त दिले आहे. सिद्धार्थने या मुलीचे अपहरण करून तिची तस्करी केली होती. सिद्धार्थ सध्या मोसूलमध्ये आहे. मोसूल हे शहर इसिसचा इराकमधील बालेकिल्ला मानला जातो.
इस्लाम धर्म स्विकारणारा सिद्धार्थ ब्रिटीश नागरिक असून तो आता अबू रुमायसा या नावाने ओळखला जातो. ब्रिटीश पोलिसांच्या डोळ््यात धुळ फेकत सिद्धार्थ त्याची पत्नी आणि लहान मुलांसह २०१४ मध्ये सीरियाला गेला होता. (वृत्तसंस्था)

Web Title: Senior commander of Siddhartha Dhar Isis?