शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
5
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
6
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
7
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
8
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
9
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
10
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
11
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
12
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
13
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
14
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
15
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
16
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
18
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
19
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
20
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी

सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 22:41 IST

Boeing 737 plane fire in Senegal: या घटनेत विमानातील 10 प्रवासी जखमी झाले आहेत

Boeing 737 plane fire in Senegal: सेनेगलची राजधानी डकार येथील विमानतळावर एक मोठी दुर्घटना टळली. बोईंग 737 विमान धावपट्टीवरून घसरले. त्यामुळे विमानाला आग लागली आणि प्रवाशांमध्ये घबराट पसरली. या घटनेत विमानातील 10 प्रवासी जखमी झाले आहेत. देशाचे परिवहन मंत्री एल मलिक एनडिया यांनी गुरुवारी सांगितले की विमानात एकूण 85 लोक होते. ट्रान्सएअरद्वारे संचालित एअर सेनेगलचे बोईंग 737 विमान बुधवारी रात्री उशिरा बामाकोकडे जात होते. त्याच वेळी विमानाला अपघात झाला. विमानात 79 प्रवासी, दोन पायलट आणि चार क्रू मेंबर्स होते. कोणतीही जिवीतहानी नाही.

विमान अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर लोकांची हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सेनेगलमधील बोईंग विमानाने धावपट्टी सोडल्यानंतर काही वेळा विमानतळ पुन्हा सुरू करण्यात आले, अशी माहितीही परिवहन मंत्र्यांनी दिली. एका प्रवाशाने शेअर केलेल्या व्हिडीओनुसार विमानाला आग लागल्याचे दिसले. मालियन संगीतकार झेक सिरिमने सिसोकोने फेसबुकवर एका पोस्टमध्ये लिहिले की आमच्या विमानाला नुकतीच आग लागली. विमानाच्या एका बाजूला ज्वाळांनी पेट घेतल्याने रात्रीच्या वेळी प्रवासी आपत्कालीन स्लाइडवरून खाली उडी मारताना दिसले. व्हिडिओमध्ये लोकांचा आरडाओरडाही स्पष्टपणे ऐकू येत आहे.

विमान अपघातांवर लक्ष ठेवणाऱ्या एव्हिएशन सेफ्टी नेटवर्क (ASN) ने अग्निशामक फोमने वेढलेल्या गवताळ शेतात खराब झालेल्या विमानाचे फोटो प्रकाशित केले. विमानाची छायाचित्रे पाहता विमानाचे एक इंजिन आणि एका पंखाचे नुकसान झाल्याचे दिसून येते.

टॅग्स :airplaneविमानfireआगAirportविमानतळAccidentअपघात