शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बघतोच अमेरिका F-16V कसे उडवितो! चीन खवळला; तैवानची एयरफील्डच उद्ध्वस्त करण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 08:48 IST

तैवानवर कब्जा करू पाहणाऱ्या चीनला अमेरिका नेहमीच मोठा अडसर ठरत आली आहे. आजही तैवानला अमेरिका रसद पुरवत असल्याने आणि संरक्षण देत असल्याने चीनला तैवान गिळंकृत करण्याची संधी मिळत नाहीय.

बिजिंग : तैवानवर कब्जा करू पाहणारा चीन खवळला आहे. अमेरिका 66 F-16V लढाऊ विमाने तैवानला देणार आहे. यामुळे चीनने आम्ही तैवानची हवाई पट्टीच उद्ध्वस्त करू, मग पाहूच अमेरिका त्यांची F-16V विमाने कशी काय उडवितो, अशी थेट धमकीच देऊन टाकली आहे. 

तैवानवर कब्जा करू पाहणाऱ्या चीनला अमेरिका नेहमीच मोठा अडसर ठरत आली आहे. आजही तैवानला अमेरिका रसद पुरवत असल्याने आणि संरक्षण देत असल्याने चीनला तैवान गिळंकृत करण्याची संधी मिळत नाहीय. काही दिवसांपूर्वी चीनच्या लढाऊ विमानांनी तैवानच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच मिसाईल डागण्यात आली. यामुळे चीनच्या पायलटांनी मागे परतणे पसंत केले. आता तैवानची ताकद आणखी वाढणार आहे. कारण अमेरिका तैवानला 66 लढाऊ विमाने देणार आहे. यावर चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने ही धमकी दिली आहे. 

चीनची लढाऊ विमाने एवढी ताकदवर आहेत की काही क्षणांत तैवानचे हवाई तळ उद्ध्वस्त करू शकतात. हा विध्वंस पाहून अमेरिकेची विमाने उड्डाण पण करू शकणार नाहीत, अशी धमकी देण्यात आली आहे. चीनच्या लष्करासाठी अमेरिकेचे लढाऊ विमान धोक्याची ठरू शकतात. मात्र, चीनकडे त्यांच्यापेक्षा ताकदवर J-10B व J-10C लढाऊ विमाने आहेत. यापेक्षा J-11 चा तर अमेरिका सामनाही करू शकत नाही. J-20 तर दूरच राहिले, असे एका तज्ज्ञाने म्हटले आहे. तैवानबाबत बळजबरी झाली तर आम्ही तैवानचे हवाईतळ अशाप्रकारे उद्ध्वस्त करू की अमेरिकेची विमाने उडू शकणार नाहीत. एवढेच नाही तर जी विमाने हवेत झेपावली आहेत ती खाली उतरू शकणार नाहीत, अशी धमकी दिली आहे. 

लढाऊ विमानांच्या खरेदीची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. या योजनेला 2019 मध्येच मंजुरी दिली जाणार होती. आता हा व्यवहार 2026 च्या शेवटी पूर्ण होणार असून तैवानला एकूण 90 विमाने विकली जाणार आहेत. यापैकी 66 लढाऊ विमाने असणार आहेत. चीनसोबतचा तणाव पाहून तैवान आपली लष्करी ताकद वाढवू लागला आहे. गेल्या वर्षी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने वॉशिंग्टनकडे तैवानला लढाऊ विमाने न विकण्याचे तसेच शस्त्रे विक्री रोखण्याची विनंती केली होती. तसेच असे न केल्यास कारवाई करण्याची धमकी दिली होती. तैवानच्या राष्ट्रपती त्साई २०१६ मध्ये सत्तेवर आल्या आहेत. त्यांनी चीनच्या वन चायना पॉलिसीचा विरोध केला आहे. यामुळे चीनने लष्करी कारवाईचा इशारा दिला आहे. यामुळे चीन अधुनमधून लढाऊ विमाने आणि युद्धनौका तैवानच्या क्षेत्रात पाठवत असतो.

अन्य महत्वाच्या बातम्या...

सावधान! Work From Home चा मोठा फटका बसणार; Income Tax भरताना नाकीनऊ येणार

हवामान बदल धोक्याचा; 'देवीसारखे जुने व्हायरस आयुष्यात परतणार', संशोधकांचा इशारा

शेतकरी सन्मान योजनेचे 2000 रुपये मिळाले नाहीत? अशी करा तक्रार

TATA कंपनीला ब्रिटिशांचा 'टाटा'; मिळणार नाही बेलआऊट पॅकेज

भयावह! देशात कोरोनाबळींचा आकडा 50000 समीप; दिवसभरात 63 हजार नवे रुग्ण

मैदान सोडलय, क्रिकेट नाही! धोनीच्या नव्या कंपनीचे मुंबईत ऑफिस; कानोकान खबर नाही

चीनला दणका! अमेरिका तैवानला देणार लढाऊ विमानांची फौज

व्होडाफोन, एअरटेल ग्राहकांना झटका देणार; सप्टेंबरपासून रिचार्ज महाग होण्याची शक्यता 

टॅग्स :chinaचीनAmericaअमेरिकाfighter jetलढाऊ विमान