सिनेटची हेरगिरी; सीआयएची माफी
By Admin | Updated: August 2, 2014 03:39 IST2014-08-02T03:39:51+5:302014-08-02T03:39:51+5:30
अमेरिकी गुप्तचर संस्था सीआयएने चौकशीशी संबंधित अमेरिकी सिनेटर आणि त्यांच्या स्टाफच्या वापरातील संगणकाची हेरगिरी केल्याची कबुली देत माफी मागितली आहे.

सिनेटची हेरगिरी; सीआयएची माफी
वॉशिंग्टन : अमेरिकी गुप्तचर संस्था सीआयएने चौकशीशी संबंधित अमेरिकी सिनेटर आणि त्यांच्या स्टाफच्या वापरातील संगणकाची हेरगिरी केल्याची कबुली देत माफी मागितली आहे. सीआयएने जारी केलेल्या एका निवेदनानुसार, २००९ मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पाळत ठेवल्याची कबुली दिली. २००९ मध्ये सिनेटच्या एका समितीद्वारे सीआयएच्या चौकशीबाबत तपास सुरू केली होती. मात्र, सीआयएद्वारे आपल्या तपासावर पाळत ठेवली जात असल्याच्या वृत्तावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.