शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

दोन वाक्यं, किंवा सात शब्दांमध्ये सामावलंय मायक्रोसॉफ्टच्या सत्या नाडेलांच्या नेतृत्वाचं रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 5:09 PM

सत्या नाडेलांनी मायक्रोसॉफ्टच्या सीईओ पदाची सुत्रे हाती घेतली, त्यावेळी अनेकांनी भुवया वर केल्या होत्या. पण नाडेलांच्या नेतृत्वाखाली मायक्रोसॉफ्ट पुन्हा बहरली. साडेतीन वर्षांमध्ये मायक्रोसॉफ्टचं बाजारमूल्य 250 अब्ज डॉलर्सनी वधारलं... त्यांच्या नेतृत्वाच्या यशाचं रहस्य दडलंय सात शब्दांमध्ये

ठळक मुद्देछोट्या छोट्या गोष्टीत हस्तक्षेप करणं बंद कराशिका आणि वाढा हे नीट समजावणारं ट्रेनिंग सेशन ठेवाआपण काम उत्कृष्ट कसं करू शकतो हे विचारा आणि नंतर गप्प बसा आणि कर्मचाऱ्यांचं ऐका

सत्या नाडेलांनी मायक्रोसॉफ्टच्या सीईओ पदाची सुत्रे हाती घेतली, त्यावेळी अनेकांनी भुवया वर केल्या होत्या. पण नाडेलांच्या नेतृत्वाखाली मायक्रोसॉफ्ट पुन्हा बहरली. साडेतीन वर्षांमध्ये मायक्रोसॉफ्टचं बाजारमूल्य 250 अब्ज डॉलर्सनी वधारलं. या कालावधीमध्ये उबर, एअरबीएनबी, नेटफ्लिक्स, स्नॅपचॅट, स्पॉटिफाय व वी वर्क यांच्यापेक्षा मायक्रोसॉफ्टची वाढ जास्त होती. हे कसं काय शक्य झालं यानं अनेकांना बसलेला आश्चर्याचा धक्का अजून ओसरलेला नाही. परंतु, नाडेला यांनी लिहिलेल्या पुस्तकातला काही भाग नाडेला यांच्या नेतृत्वावर प्रकाश टाकतो आणि त्यांची कार्यशैली सांगतो. नाडेलांच्या कार्यशैलीमुळेच मायक्रोसॉफ्टमध्ये कमालीचे बदल झाले आणि कंपनीची प्रगती वेगानं होण्यास पुन्हा सुरुवात झाली असं मानण्यास जागा आहे. मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांपैकी 95 टक्के कर्मचाऱ्यांनी नाडेलांवर पसंतीची मोहर उमटवली आहे यावरून त्यांच्यातील नेत्याची छाप दिसून येते.

इतक्या मोठ्या कंपनीला प्रगतीपथावर न्यायचं तर सगळ्या कर्मचाऱ्यांना एकाच दिशेने प्रेरीत करणं महत्त्वाचं असून यातच नाडेला यांच्या लोकप्रियतेचं रहस्य सामावलेलं आहे. नाडेलांनी त्यांच्या Hit Refresh: The Quest to Rediscover Microsoft’s Soul and Imagine a Better Future for Everyone या नव्या पुस्तकामध्ये अशा काही नेतृत्वगुणांवर प्रकाश टाकला आहे, की यापासून आपल्या सगळ्यांनाच बोध घेता येईल.नाडेला म्हणतात, "आपली स्वप्नं सत्यात येऊ शकतात का हे कशावर अवलंबून असेल तर ते आपण एकत्र काम करू शकतो का यावर असतं. एकत्र येणं, या मूल्यांना संस्कृतीमध्ये रुपांतरीत करणं हे काम मी मायक्रोसॉफ्टमध्ये केलं. जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी यावर बोललो. पण, कर्मचाऱ्यांनी सत्याचे विचार अशा दृष्टीने याकडे बघू नये याची मी दक्षता घेतली. ही संस्कृती हे कल्चर कर्मचाऱ्यांना आपलं वाटायला हवं अशीच माझी इच्छा होती. कामाची संस्कृती बदलण्यासाठी आवश्यक असतं प्रत्येक व्यक्तिला सबल करणं.

बदल घडवण्यासाठी काय आवश्यक आहे याचा विचार करताना आपण कधी कधी एकमेकांना कमी लेखतो. तसेच, इतरांनी आपल्यासाठी काय करायला हवं याबद्दलही आपण अवाजवी अपेक्षा बाळगतो. एका अशाच मुलाखतीच्या वेळी मला धक्का बसला होता. मला एका कर्मचाऱ्यानं विचारलं, मी माझ्या मोबाइलमधून एखादं डॉक्युमेंटची प्रिंट का नाही घेऊ शकत? मी अत्यंत नम्रपणे त्याला सांगितलं, तुला संपूर्ण अधिकार आहेत, हे घडवून दाखव."

दोन वाक्यांमध्ये किंवा खरंतर सात शब्दांमध्ये नाडेलांनी अशी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली जी नेते करत नाहीत. खऱ्या अर्थी कर्मचाऱ्यांचं सबलीकरण. खऱ्या अर्थी कर्मचाऱ्यांना अधिकार देणं. आणि हे तेव्हाच होतं, ज्यावेळी तुम्ही कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवता.अनेक नेते कर्मचाऱ्यांना सबल करण्याचा प्रयत्न करतात, परंतु आपल्या हातातून नियंत्रण जावं असं त्यांना वाटत नसतं. यामुळे कंपनीची वाढ अत्यंत वेगानं होण्यावर बंधनं येतात. मग रोजच्या रोज कर्मचाऱ्यांना कसं सबल करणार?

 नाडेलांच्या पद्धतीत यावर उत्तर आहे, 

- छोट्या छोट्या गोष्टीत हस्तक्षेप करणं बंद करा. - शिका आणि वाढा हे नीट समजावणारं ट्रेनिंग सेशन ठेवा.- आपण काम उत्कृष्ट कसं करू शकतो हे विचारा आणि नंतर गप्प बसा आणि कर्मचाऱ्यांचं ऐका... त्यांना आव्हानात्मक कामं द्या पण त्यांच्यामधलं मोटिव्हेशन मारू नका.- तुम्ही चूक केली असेल तर जबाबदारी स्वीकारा, स्वत:च्या उदाहरणातून शिकवा.- आणि नेहमी कर्मचाऱ्यांना हे जादुई शब्द सांगा... "तुला संपूर्ण अधिकार आहेत, हे घडवून दाखव..."