शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

गुरूत्वीय लहरींबरोबर गॅमा किरणांचाही शोध, भारतीय शास्त्रज्ञांचे महत्त्वपूर्ण योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 23:58 IST

दोन न्युट्रॉन ता-यांच्या धडकेतून उत्पन्न झालेल्या गुरूत्वीय लहरी व त्यातून बाहेर पडणा-या गॅमा किरणांचा (प्रकाश किरण) एकाचवेळी शोध घेण्यात खगोलशास्त्रज्ञांना पहिल्यांदाच यश मिळाले आहे.

 - राजानंद मोरे पुणे : दोन न्युट्रॉन ता-यांच्या धडकेतून उत्पन्न झालेल्या गुरूत्वीय लहरी व त्यातून बाहेर पडणा-या गॅमा किरणांचा (प्रकाश किरण) एकाचवेळी शोध घेण्यात खगोलशास्त्रज्ञांना पहिल्यांदाच यश मिळाले आहे. दोन न्युट्रॉन ता-यांची ही पहिलीवहिली धडक टिपता आल्याने गुरूत्वलहरी या निर्वात पोकळीत प्रकाशाच्या वेगाने प्रवास करतात, या आईनस्टाईन यांच्या भाकितालाही भक्कम पुरावा मिळाला आहे. या शोधामध्ये भारतीय खगोलशास्त्रज्ञांचेही महत्वपुर्ण योगदान आहे.अमेरिकेतील लायगो आणि युरोपमधील व्हर्गो या दोन वेधशाळांनी दि. १७ आॅगस्ट रोजी न्युट्रॉन ता-यांची धडक टिपली आहे. अमेरिकेतील नॅशनल सायन्स फाऊंडेशनने सोमवारी पत्रकार परिषदेत या संशोधनाची घोषणा केली. पुण्यातील ‘आयुका’ येथे खगोलशास्त्रज्ञांच्या उपस्थितीत याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.दोन न्युट्रॉन ता-यांच्या धडकेची घटना आपल्यापासून केवळ १३ कोटी प्रकाशवर्ष दुर घडल्यामुळे गुरूत्वलहरींचे आतापर्यंतचे सर्वात ठळक निरीक्षण नोंदविले गेले आहे. यापुर्वी चार वेळा गुरूत्वीय लहरींचा शोध लागला असला तरी त्या आपल्यापासून खुप दुर अंतरावर होत्या. ही घटना पहिल्यांदाच पृथ्वीपासून इतक्या जवळ घडल्याने गॅमा किरणांचा शोध लावण्यात यश मिळाले आहे. ता-यांच्या धडकेमुळे घडलेल्या विस्फोटातून गॅमा किरणांचा झगमगाट बाहेर पडला. या किरणांचा विस्फोट उपग्रहस्थित विविध दुर्बिणींनी गुरूत्वलहरींच्या निरीक्षणानंतर केवळ दोन सेकंदांच्या फरकाने टिपला आहे. यामुळे दोन न्युट्रॉन ता-यांच्या धडकेमुळे गॅमा किरणे दिसतात या अनेक वर्ष जुन्या सिध्दांताला पुष्टी मिळाली आहे.  न्युट्रॉन तारा...मोठ्या ता-यांच्या विस्फोटातून शिल्लक राहिलेला गाभा म्हणजे न्युट्रॉन तारा. हे न्युट्रॉन तारे आकाराने लहान आणि सर्वाधिक घनतेचे असतात. सुर्याच्या जवळजवळ दीड पट वस्तुमानाच्या न्युट्रॉन ता-याचा व्यास अंदाजे दोन किलोमीटर असतो. म्हणजे एका छोट्या चमचाभर अशा ता-याच्या तुकड्याचे वस्तुमान अख्ख़्या सह्याद्री पर्वत, पश्चिम घाट यापेक्षाही अधिक भरेल. एकमेकांभोवती फिरत, जवळ येत आणि अखेर विलीन होण्याच्या प्रक्रियेचा अखेरचा साधारण १०० सेकंदांचा दोन न्युट्रॉन ता-यांचा प्रवास शास्त्रज्ञांना गुरूत्व लहरींच्या माध्यमातून टिपता आला. भारतीय शास्त्रज्ञांचा सहभाग...गुरूत्वीय लहरी व गॅमा किरणांच्या शोधामध्ये पुण्यातील आयुका व आयसरसह भारतातील १३ वेगवेगळ्या संशोधन संस्थांमधील ४० संशोधकांचा सहभाग आहे. आयुकातील अनिबॉण आई, सुकांत बोस, संजीव धुरंधर, भूषण गद्रे, शरद गावकर, संजीत मित्रा, निखिल मुकूंद, अभिषेक परिदा, जयंती प्रसाद, तरूण सौरदीप आणि जिष्णू सुरेश या ११ जणांचा यामध्ये सहभाग आहे. गुरुत्वाकर्षण तरंगांच्या शोधयंत्राशी होणा-या प्रतिक्रियेचे आकलन, जमिनीवरील हालचालींचा शोधयंत्रावर होणारा परिणाम, गुरूत्वाकर्षणीय तरंगाच्या शोधासाठी माहितीचे विश्लेषण पध्दतींचा शोध, न्युट्रॉन ताºयाच्या विविध गुणधर्णांचा अभ्यास अशा विविध बाबतीत त्यांना मोलाचे काम केले आहे. या विस्फोटाच्या विद्युतचुंबकीय दुर्बिणीच्या साहाय्याने निरीक्षण करण्यामध्ये दीपंकार भट्टाचार्य, जावेद राणा, गुलाब दिवंगण, अजय विभुते आणि रुपक रॉय यांचा समावेश आहे. खजिन्याचा शोधएकाचवेळी गुरूत्वीय लहरी व गॅमा किरणांची नोंद झाल्याने हा शोध खुप महत्वपुर्ण असल्याचे खगोलशास्त्रज्ञांनी सांगितले. यामुळे या ताºयांची जडणघडण आपल्याला कळू शकेल. तसेच आपल्या विश्वाचे प्रसारण मोजण्याचा एक नवा व स्वतंत्र मार्गही उपलब्ध झाला आहे. तसेच या शोधामुळे नवीन जड मुलद्रव्य निर्मितीचे पुरावेही मिळाले आहेत. यातून अशा अवकाशीय टकरी म्हणजे लोखंडापेक्षा जड मुल्यद्रव्ये निर्मितीचे नैसर्गिक कारखानेच असल्याचे सिध्द झाले आहे. यामध्ये सोन्यासह प्लॅटिनम या मुलद्रव्यांचाही समावेश आहे.

टॅग्स :scienceविज्ञानPuneपुणे