एक नवविवाहित नवरी तिच्या हनीमून दरम्यान एका दुर्घटनेची शिकरी झाली आणि डोंगरावरून खाली पडली. डोंगरावरून खाली पडल्याने नव्या नवरीचा जागीच मृत्यू झालाय. प्राथमिक तपासात पोलिसांनी ही घटना संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे.
मिरर यूके वेबसाइटनुसार, स्कॉटलॅंडमध्ये ३१ वर्षीय फाजिया जावेद कथितपणे आपल्या लग्नाच्या रिसेप्शननंतर काही दिवसांतच एडिनबर्गला गेली होती. या हनीमून ट्रिप दरम्यान महिला गुरूवारी रात्री साधारण ९ वाजता आर्थर सीट हिलच्या डोंगरावर गेली होती.
मात्र, इथे तिच्यासोबत वाईट घटना घडली. फाजिया डोंगरावरून खाली अनेक फूट खाली पडली. सूचना मिळताच इमरजन्सी सेवा घटनास्थळी पोहोचल्या. पोलीस, पॅरामेडिक्स टीमच्या प्रयत्नांनंतरही फाजियाचा जीव वाचवता आला नाही. रिपोर्टनुसार, फाजियाच्या दु:खद मृत्यूआधी ती कथितपणे गर्भावस्थेच्या पहिल्या टप्प्यात होती. पण अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली नाही.
स्कॉटलॅंड पोलिसांनी सांगितलं की, घटनेची चौकशी करत असताना एका २७ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या एका प्रवक्त्याने सांगितलं की, 'आम्हाला एक रिपोर्ट मिळाला की, एक महिला आर्थर सीट एडिनबर्ग इथे गुरूवारी २ सप्टेंबरला रात्री ९ वाजता खाली पडली होती. सूचना मिळाल्यावर लगेच इमरजन्सी सेवा घटनास्थळी पाठवण्यात आल्या. पण ३१ वर्षीय महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तिचा मृत्यू संशयास्पद मानला जात आहे'.