SCO मध्ये पीएम मोदींच्या कृतीची सर्वत्र चर्चा, शाहबाज शरीफ आणि एर्दोगानपासून ठेवले अंतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 20:46 IST2025-08-31T20:46:28+5:302025-08-31T20:46:37+5:30

SCO Summit 2025: चीनमध्ये आयोजित एससीओ समिटमध्ये अनेक देशांचे प्रमुख एका मंचावर आले.

SCO Summit 2025: PM Modi's actions in SCO discussed everywhere, keeps distance from Shahbaz Sharif and Erdogan | SCO मध्ये पीएम मोदींच्या कृतीची सर्वत्र चर्चा, शाहबाज शरीफ आणि एर्दोगानपासून ठेवले अंतर

SCO मध्ये पीएम मोदींच्या कृतीची सर्वत्र चर्चा, शाहबाज शरीफ आणि एर्दोगानपासून ठेवले अंतर

SCO Summit 2025: भारताने चीनमध्ये आयोजित एससीओ समिटमध्ये दाखवलेल्या राजनैतिकतेची सध्या चर्चा होत आहे. चीनमधील तियानजिन येथे एससीओचे सर्व सदस्य एकाच व्यासपीठावर आले. फोटो सेशननंतर पंतप्रधान मोदींनी पाकिस्तान आणि तुर्की वगळता सर्व देशांच्या प्रमुखांची भेट घेतली. या दरम्यान त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्यापासून अंतर राखले.

फोटो सेशननंतर पंतप्रधान मोदींनी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली, ताजिकिस्तानचे अध्यक्ष इमोमाली रहमान, इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मादबौली, बेलारूसचे अध्यक्ष यांच्यासह अनेक नेत्यांची भेट घेतली, परंतु त्यांनी शाहबाज आणि एर्दोगान यांना दुर्लक्षित केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले आहेत. यादरम्यान, तुर्कीने पाकिस्तानला मदत केल्यामुळे भारत आणि तुर्कीचे संबंधदेखील बिगडले आहेत. 

भारत आणि तुर्कीमधील संबंध का बिघडले?
भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांबाबत सर्वांनाच माहिती आहे, परंतु भारताचे तुर्कीशी पूर्वी असलेले चांगले संबंध सध्या बिघडले आहेत. यामागील कारण पाकिस्तान आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तुर्कीने ऑपरेशन सिंदूरला विरोध केला आणि भारताविरुद्ध पाकिस्तानला शस्त्रेही पुरवली. भारताने तुर्कीच्या या कृतीवर जोरदार टीका केली.

त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला. तणाव इतका वाढला की, भारतात तुर्कीवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू झाली. लोकांनी तुर्कीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली. व्यापाऱ्यांनी तुर्कीमधून सफरचंद, संगमरवर आणि इतर वस्तू आयात करणे बंद केले.

Web Title: SCO Summit 2025: PM Modi's actions in SCO discussed everywhere, keeps distance from Shahbaz Sharif and Erdogan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.