कॅलिफोर्नियामध्ये शाळेत गोळीबार

By Admin | Updated: April 11, 2017 07:18 IST2017-04-11T00:35:29+5:302017-04-11T07:18:20+5:30

कॅलिफोर्नियामधील एका प्राथमिक शाळेत शिक्षिकेच्या नव-याने गोळीबार केला. यामध्ये शिक्षिका आणि एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला

School firing in California | कॅलिफोर्नियामध्ये शाळेत गोळीबार

कॅलिफोर्नियामध्ये शाळेत गोळीबार

>
ऑनलाइन लोकमत
लॉस एंजेलिस, दि. 11 -  कॅलिफोर्नियामधील एका प्राथमिक शाळेत शिक्षिकेच्या नव-याने गोळीबार केला. यामध्ये शिक्षिका आणि एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून या गोळीबारानंतर त्याने स्वत:वर देखील गोळी झाडली. त्यात त्याचा मृत्यू झाला. 
पोलिसांनी दिलेलेया माहितीनुसार, सॅन बर्नाडिनो येथील नॉर्थ पार्क एलिमेंटरी शाळेत सोमवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली. सेड्रिक अँडरसन असे गोळीबार करणा-या संशयित व्यक्तीचे नाव असून त्याने शाळेत जाऊन शिक्षिका असलेली आपली पत्नी करेन स्मिथ हिच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात पत्नीसह एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. तर, अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर सेड्रिक अँडरसनने स्वत:वर देखील गोळी झाडली. त्यात त्याचा सुद्धा मृत्यू झाला. 
दरम्यान, जखमी विद्यार्थ्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: School firing in California