म्हणे, आम्ही भारताचे पाच सैनिक मारले; भारताने दावा फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 12:30 AM2018-02-17T00:30:38+5:302018-02-17T00:30:53+5:30

भारताने जानेवारीपासून आतापर्यंत पाकच्या २0 सैनिकांना ठार केल्यानंतर पाकिस्तानने भारताला नमवल्याची भाषा केली आहे. नियंत्रण रेषेजवळ तट्टा पानी सेक्टरमध्ये भारताची एक चौकी उद्ध्वस्त करून, पाच भारतीय सैनिका मारल्याचा दावा केला आहे.

To say, we killed five soldiers of India; India rejects the claim | म्हणे, आम्ही भारताचे पाच सैनिक मारले; भारताने दावा फेटाळला

म्हणे, आम्ही भारताचे पाच सैनिक मारले; भारताने दावा फेटाळला

Next

इस्लामाबाद : भारताने जानेवारीपासून आतापर्यंत पाकच्या २0 सैनिकांना ठार केल्यानंतर पाकिस्तानने भारताला नमवल्याची भाषा केली आहे. नियंत्रण रेषेजवळ तट्टा पानी सेक्टरमध्ये भारताची एक चौकी उद्ध्वस्त करून, पाच भारतीय सैनिका मारल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्विट करून ही माहिती दिली. मात्र भारतीय अधिकाºयांनी पाकिस्तानचा हा दावा फेटाळून लावला आहे.
जनरल गफूर यांनी याबाबत ट्विट केले आहे. यात त्यांनी जोडलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये एका चौकीवर हल्ला होताना व घटनास्थळाहून धूर निघताना दिसत आहे. पाकने गुरुवारी भारतीय उच्चायुक्त जे.पी. सिंह यांना बोलावून भारतीय सैन्याकडून होणाºया गोळीबाराचा निषेध केला होता. (वृत्तसंस्था)

Web Title: To say, we killed five soldiers of India; India rejects the claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.