अर्धनग्न अवस्थेत चोरट्याकडून कार वाचविली
By Admin | Updated: January 21, 2016 19:28 IST2016-01-21T19:28:38+5:302016-01-21T19:28:38+5:30
युरोपमधल्या कडाक्याच्या थंडीतही कारची चोरी रोखण्यासाठी भल्या पहाटे अर्धनग्न अवस्थेत घराबाहेर पडून कार वाचविणा-या आणि चोरट्याला गजाआड करणा-या एका गृहस्थाने जगाला अचंबित केले.

अर्धनग्न अवस्थेत चोरट्याकडून कार वाचविली
ऑनलाइन लोकमत
युरोप, दि. २१ - युरोपमधल्या कडाक्याच्या थंडीतही कारची चोरी रोखण्यासाठी भल्या पहाटे अर्धनग्न अवस्थेत घराबाहेर पडून कार वाचविणा-या आणि चोरट्याला गजाआड करणा-या एका गृहस्थाने जगाला अचंबित केले.
नॉर्वेतील क्रस्टियन्सन्ड येथील एका गृहस्थाला घराबाहेर पार्क केलेली गाडी चोरी होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर हा गृहस्थ घरात ज्या अवस्थेत होता त्याच म्हणजे अर्धनग्न अवस्थेत घराबाहेर येऊन आपली कार चोरी करणा-या चोरट्याला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र चोर कार घेऊन जात असताना कारचा पाठलाग करत कारच्या टपावर बसून जवळपास ९० किलोमीटर इतके अंतर भर थंडीत कापले आणि अखेर कार एका बॅरिअरला आदळली, त्यावेळी या गृहस्थाने चोराला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.
दरम्यान, हा सर्व घडलेला प्रकार एका हॉलीवूड चित्रपटांसारखा असल्याचे पोलिसांनी सांगितले.