सौदीत वीस भारतीय ठार

By Admin | Updated: September 9, 2015 08:35 IST2015-09-09T05:34:56+5:302015-09-09T08:35:51+5:30

सौदीच्या हवाई हल्ल्यात वीस भारतीय ठार झाल्याची घटना मंगळवारी येमेनमधील होदायदाह बंदरावर घडल्याचे वृत्त आहे. सौदी अरेबियाने तेल तस्करांवर हा हल्ला

Saudi twenty Indian killed | सौदीत वीस भारतीय ठार

सौदीत वीस भारतीय ठार

ऑनलाइन लोकमत
साना, दि.९ -  सौदीच्या हवाई हल्ल्यात वीस भारतीय ठार झाल्याची घटना मंगळवारी येमेनमधील होदायदाह बंदरावर घडली. सौदी अरेबियाकडून बंदरावरील तेल तस्करांवर हा हल्ला करण्यात आला. यासंबंधी माहिती येथील स्थानिक रहिवासी आणि मच्छीमारांनी दिली आहे. 

हा हवाई हल्ला होदायदाह बंदराजवळ अल खोखा नामक दोन बोटींवर करण्यात आला. या बोटींतून प्रवास करणारे वीस भारतीय नागरिक ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, येमेनमध्ये अशा प्रकारचे हल्ले होण्याची ही पहिलीच वेळ नसून, याआधी गेल्या शनिवारी झालेल्या हवाई हल्ल्यात दोन कुटुंबातील किमान २७ लोक ठार झाले होते.

Web Title: Saudi twenty Indian killed