शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाकिस्तानसह २० देशांना सौदी अरेबियाचा झटका; परदेशी नागरिकांच्या प्रवासावर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 15:35 IST

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाच्या सरकारचा निर्णय

ठळक मुद्देभारत-पाकिस्तानसह २० देशांच्या प्रवाशांना प्रवासबंदीहा निर्णय तात्पुरता असल्याची सौदी अरेबिया सरकारची माहिती

सौदी अरेबियानंभारत, पाकिस्तानसह २० देशांना मोठा झटका दिला आहे. सौदी अरेबियाच्या सरकारनं २० देशांच्या नागरिकांच्या प्रवासावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सौदी अरेबियाच्या सरकारनं हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, यातून राजकीय व्यक्ती, सौदी अरेबियाचे नागरिक आणि डॉक्टरांसह त्यांच्या कुटुंबीयांना प्रवासास मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, ही बंदी थोड्या कालावधीसाठी असल्याचं सौदी अरेबियानं स्पष्ट केलं आहे. तसंच बुधवारी रात्री ९ वाजल्यापासून ही प्रवासबंदी लागू होणार आहे. यामध्ये भारत, पाकिस्तान, लेबनान, तुर्कस्थान, इटली, पोर्तुगल, स्वीडन, स्वित्झर्लंड, अमेरिका, अर्जेंटिना, ब्राझील, इंडोनेशिया, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती, जर्मनी, ब्रिटन, आयर्लंड, इटलीसारख्या देशांचाही समावेश आहे. या कालावधीदरम्यान पुरवठा सेवेवर कोणताही परिणाम होणार नाही आणि जहाजंदेखील जाऊ-येऊ शकतील याची काळजी घेतली जाणार असल्याचं सौदीच्या सरकारनं स्पष्ट केलं. सौदी अरेबियाचे नागरिक, राजकीय व्यक्ती किंवा आरोग्य कर्मचारी यांना आणि त्यांनी कुटुंबीयांना देशात येण्याची परवानगी असेल. परंतु त्यांना आरोग्य मंत्रालयाच्या कोरोना विषयक नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागणार असल्याचं सांगितलं आहे. तर दुसरी पाकिस्तानला सौदी अरेबियानं यापूर्वीच झटका दिला आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सनं दिलेल्या माहितीनुसार सौदीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारपासूनच पाकिस्तानच्या नागरिकांच्या प्रवासावर निर्बंध घातले असल्याची माहिती दिली. जर नागरिकांनी आरोग्यविषयक नियमांचं पालन केलं नाही तर त्यांच्यावर कोरोनाविषयक नवे निर्बंध घातले जाऊ शकतात असा इशारा यापूर्वी रविवारी सौदी अरेबियाचे आरोग्यमंत्री तौफिक अल-रबियाह यांनी दिला होता. पाकिस्तान आणि भारतातील अनेक लोकं सौदी अरेबियात काम करतात. या निर्णयाचा त्यांच्यावर परिणाम होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाIndiaभारतPakistanपाकिस्तानAmericaअमेरिकाUnited Arab Emiratesसंयुक्त अरब अमिरातीcorona virusकोरोना वायरस बातम्या