शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 17:02 IST

Dubai Sky Stadium NEOM: २०२७ मध्ये बांधकाम सुरू होऊन २०३२ मध्ये पूर्ण होणार आहे

Dubai Sky Stadium NEOM: २०३४ मध्ये सौदी अरेबिया फिफा विश्वचषक आयोजित करणार आहे. त्याआधी देश जगातील पहिले स्काय स्टेडियम बांधण्याची तयारी करत आहे. निओम असे स्टेडियमला नाव देण्यात आले आहे. हे जमिनीपासून ३५० मीटर (१,१५० फूट) उंचीवर असेल. त्यात एका वेळी ४६,००० लोक खेळाचा आनंद घेऊ शकतील. स्मार्ट सिटी असलेल्या निओममधील द लाईन प्रकल्पात हे स्टेडियम बांधले जाणार आहे.

प्रकल्पाची किंमत किती?

या प्रकल्पाची किंमत अंदाजे १ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. २०२७ मध्ये बांधकाम सुरू होऊन २०३२ मध्ये पूर्ण होणार आहे. विश्वचषकाच्या दोन वर्षे आधी हे स्टेडियम बांधून पूर्ण होईल. हे स्टेडियम पूर्णपणे सौर आणि पवन ऊर्जेसारख्या अक्षय्य ऊर्जा स्रोतांवर चालेल. हे अशा प्रकारचे पहिले स्टेडियम असेल, जे पूर्णपणे पर्यावरणपूरक असेल.

विश्वचषक सामन्यांचे आयोजन

निओम स्काय स्टेडियममध्ये विश्वचषकाच्या गट टप्प्यातील, Top 32 फेरीतील, Top 16 फेरीतील आणि क्वार्टर फायनलमधील सामने होतील. स्टेडियमच्या संकल्पनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे फुटबॉल चाहते खूप उत्साहित झाले आहेत.

बांधकामातील आव्हाने कोणती आहेत?

अभियंत्यांसाठी हा प्रकल्प अत्यंत आव्हानात्मक आहे, कारण इतक्या उंचीवर स्टेडियम बांधणे सोपे नाही. निओम प्रकल्पाचे काही भाग उभारायला आधीच उशीर झाला आहे, परंतु अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की विश्वचषकाशी संबंधित सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील.

आधुनिक डिझाइन

कन्स्ट्रक्शन रिव्ह्यू मॅगझिन आणि सौदी गीगा प्रोजेक्ट्सच्या अहवालानुसार, हे स्टेडियम शाश्वत साहित्य वापरून बांधले जाईल आणि त्यात कूलिंग सिस्टम, स्मार्ट लाइटिंग आणि डिजिटल फॅन अनुभव यासारख्या आधुनिक सुविधा असतील. विश्वचषकानंतर, हे स्टेडियम निओम प्रदेशातील एका व्यावसायिक फुटबॉल क्लबचे होम ग्राउंड बनेल. ते संगीत मैफिली आणि इतर कार्यक्रमांसाठी देखील वापरले जाईल.

फिफाने निओम स्टेडियमला क्रीडा पायाभूत सुविधांसाठी एक नवीन मानक म्हणून वर्णन केले आहे. संपूर्ण NEOM प्रकल्प २०४५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, परंतु स्टेडियमचा भाग २०३२ मध्ये तयार होईल. सौदी अरेबिया रियादमध्ये किंग सलमान आंतरराष्ट्रीय स्टेडियम देखील बांधत आहेत, ज्याची क्षमता ९२७६० प्रेक्षकांची असेल आणि ते २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Saudi Arabia to Build World's First Sky Stadium for World Cup

Web Summary : Saudi Arabia plans a groundbreaking sky stadium for the 2034 FIFA World Cup. The Neom stadium, 350 meters high, accommodates 46,000 fans. Powered by renewable energy, it will host key matches. Construction starts in 2027, finishing in 2032, setting new standards for sports infrastructure.
टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाFootballफुटबॉलViral Photosव्हायरल फोटोज्Jara hatkeजरा हटकेFifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२