शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

Saudi vs USA: सौदी अरबने अमेरिकेला दिला ५० वर्षांतील सर्वात मोठा धक्का, प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 10:47 IST

Big Blow to USA from Saudi Arab: हा करार अमेरिकेच्या जगभरातील आर्थिक वर्चस्वासाठी एक मोठा मैलाचा दगड ठरला होता, मात्र आता हा करार पुन्हा होण्याची चिन्हे धुसरच आहेत.

Big Blow to USA from Saudi Arab: सौदी अरेबियाचीचीन आणि रशियाशी जवळीक सतत वाढत आहे. आता सौदीच्या बाजारपेठेत अमेरिकेचा प्रभाव हळूहळू कमी होताना दिसतोय. आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढवत असतानाच सौदी रशिया, चीन आणि जपानशी आपले संबंध मजबूत करत आहे. या संदर्भात एक पाऊल पुढे टाकत सौदी सरकारने अमेरिकेला एक मोठा धक्का दिला आहे. सौदीने अमेरिकेसोबतचा ५० वर्षांचा पेट्रो-डॉलर करार वाढवण्यास नकार दिला आहे. हा करार ९ जून रोजी संपला आहे. जगभरातील व्यवसायासाठी यूएस डॉलरऐवजी इतर चलने वापरण्यासाठी प्रोत्साहन म्हणून याकडे पाहिले जाते. त्याचा परिणाम थेट अमेरिकेवर होऊ शकतो. हा करार अमेरिकेच्या जगभरातील आर्थिक वर्चस्वासाठी एक मोठा मैलाचा दगड ठरला होता, मात्र आता हा करार पुन्हा होण्याची चिन्हे धुसरच आहेत.

पेट्रो डॉलर डील म्हणजे काय?

इन्व्हेस्टोपेडियाच्या माहितीनुसार, १९७०च्या दशकात अमेरिका व्यापारासाठी सोन्याच्या मानकांपासून दूर गेल्यानंतर पेट्रो डॉलरचा करार अस्तित्वात आला. इस्त्रायल युद्धानंतर चालू असलेल्या तेलाच्या संकटानंतर अमेरिकेने सौदी अरेबियाशी पेट्रो डॉलरचा करार केला. या करारानुसार सौदी अरेबियाने आपले सोने जगभरात डॉलरमध्ये विकावे असा करार आहे. या कराराच्या बदल्यात अमेरिकेने सौदी अरेबियाला आपल्या सुरक्षेची हमी दिली होती आणि त्याचे अनेक फायदे अमेरिकेलाही मिळाले. सर्वप्रथम त्यांना सौदीचे तेल मिळाले. दुसरे म्हणजे, त्यांचा चलन साठा जगभरात वाढू लागला. पण आता सौदीच्या नव्या निर्णयाने अमेरिकेचे जागतिक बाजारपेठेतील महत्त्व हळूहळू कमी होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.

करार संपल्यानंतर तेलाची विक्री कशी?

सौदी अरेबिया हा जगातील कच्च्या तेलाचा सर्वात मोठा निर्यातदार आहे. हा देश अनेक देशांना त्याचे तेल विकतो. बिरिक्स न्यूजनुसार, सौदी अरेबिया आता फक्त यूएस डॉलरऐवजी चीनी RMB, युरो, येन, रुपया आणि युआन यासह अनेक चलनांमध्ये तेलाचा व्यापार-विक्री करणार आहे.

टॅग्स :saudi arabiaसौदी अरेबियाUSअमेरिकाAmericaअमेरिकाchinaचीनrussiaरशिया