शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

सौदीत ११ राजपुत्र, अनेक आजी-माजी मंत्र्यांना अटक, भ्रष्टाचारविरोधी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 3:13 AM

सौदी अरेबियात आजवरच्या सर्वात व्यापक भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत ११ राजपुत्र व डझनावारी आजी-माजी मंत्र्यांना अटक करण्यात आली आहे

रियाध : सौदी अरेबियात आजवरच्या सर्वात व्यापक भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत ११ राजपुत्र व डझनावारी आजी-माजी मंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. अटक झालेल्यांमध्ये टिष्ट्वटर, अ‍ॅपल यासारख्या पाश्चात्य कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक असलेले अब्जाधीश राजपुत्र अल वालीद बिन तलाल यांचाही समावेश आहे. शक्तिशाली नॅशनल गार्डसचे प्रमुख, वित्तमंत्री व इतर बड्या पदाधिकाºयांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे. नव्याने नेमण्यात आलेले युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी सत्तेवर घट्ट पकड मिळविल्याचे संकेत या निमित्ताने दिले आहेत.गेल्याच आठवड्यात सलमान यांच्या अध्यक्षतेखाली सौदी सम्राटांनी भ्रष्टाचारविरोधी राष्ट्रीय आयोगाची स्थापना केली होती. संशयितांनी देश सोडून पळून जाऊ नये, यासाठी त्यांची खासगी विमानेही जप्त करण्यात आली आहेत. सत्तेसाठी प्रमुख दावेदार समजले जाणारे सौदी नॅशनल गार्डचे प्रमुख मुतैब बिन अब्दुल्लाह यांनाही बरखास्त करण्यात आले आहे. नौदलाचे प्रमुख आणि आर्थिक विषयांचे मंत्री यांनाही हटविण्यात आले आहे. या घटनाक्रमाने देश हादरून गेला आहे. एका आदेशात म्हटले आहे की, भ्रष्टाचारविरोधी नव्या आयोगाच्या स्थापनेनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या आयोगाचे प्रमुख वली अहद शहजादे (क्राउन प्रिंस) मोहम्मद बिन सलमान हे आहेत.सौदी अरेबियाच्या सरकारी प्रेस एजन्सीने म्हटले आहे की, सार्वजनिक मालमत्ता वाचविणे, भ्रष्ट लोकांना दंडित करणे हे आयोगाचे लक्ष्य आहे. देशातील उलेमांच्या प्रमुख परिषदेने कारवाईचे समर्थन केले आहे. दहशतवादाविरुद्ध लढाई जेवढी आवश्यक आहे, तितकीच ती भ्रष्टाचाराविरुद्ध आवश्यक असल्याचे या परिषदेने म्हटले आहे. जूनमध्ये मोहम्मद बिन सलमान यांनी उत्तराधिकारी बनण्यासाठी आपल्या ५८ वर्षीय चुलत भावाला मोहम्मद बिन नायफ यांना बाजूला केले होते. त्या वेळी सौदी अरेबियाच्या चॅनल्सने एक व्हिडीओ दाखविला होता. यात दिसत होते की, मोहम्मद बिन सलमान हे आपले मोठे भाऊ मोहम्मद बिन नायफ यांच्यासमोर आदराने गुडघे टेकवून बसले आहेत. त्यानंतर, असे वृत्त आले की, मोहम्मद बिन नायफ यांना नजरकैद करण्यात आले, पण सौदीचे अधिकारी हे वृत्त फेटाळत आलेले आहेत.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचार