शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

जग युद्धात गुंतलेलं पाहून चीननं बनवली सीक्रेट पाणबुडी, सॅटेलाइट फोटो पाहून लष्करी तज्ज्ञ काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 4:53 PM

रशिया-युक्रेन युद्धात जग अडकलेलं पाहून चीननं गुप्तपणे आपली लष्करी ताकद (Chinese Military Power 2022) वाढवली आहे.

बीजिंग-

रशिया-युक्रेन युद्धात जग अडकलेलं पाहून चीननं गुप्तपणे आपली लष्करी ताकद (Chinese Military Power 2022) वाढवली आहे. उपग्रहावरून घेतलेल्या छायाचित्रांमध्ये एक पाणबुडी (China New Submarine) आढळून आली आहे, जी आतापर्यंत जगाच्या नजरेपासून लपलेली होती. सॅटेलाइट इमेजमध्ये (Chinese Submarine Satellite Images)  ही पाणबुडी चिनी शिपयार्डच्या ड्राय डॉकमध्ये उभी असलेली दिसते. अणुऊर्जेवर चालणारी ही पाणबुडी (Chinese Nuclear Submarine)  यापूर्वी पाहिली नसल्याचे लष्करी विश्लेषकांचं म्हणणं आहे. नव्या क्लासची ही पहिली पाणबुडी असू शकते किंवा जुन्या पाणबुडीला अपग्रेड करून नवीन आकार दिला गेला आहे. यूएस ऑफिस ऑफ नेव्हल इंटेलिजेंसनुसार, २९१५ पर्यंत चिनी पीपल्स लिबरेशन आर्मी नेव्ही पाणबुडी फोर्सकडे ५७ डिझेल इलेक्ट्रिक पाणबुड्या आणि ५ अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुड्या होत्या.

नवीन मॉडेल किंवा अपग्रेड व्हर्जन? लष्करी विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार संबंधित पाणबुडी नवं मॉडेल आहे की जुन्या पाणबुडीची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे हे स्पष्ट झालेलं नाही. चीन आपल्या पाणबुडीची ताकद वेगानं वाढवत असल्याचं विश्लेषकांचं मत आहे. त्यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या पेंटागॉनच्या अहवालाचा संदर्भ दिला, ज्यात असं सुचवलं होतं की चिनी नौदल काही वर्षांपासून क्रूझ क्षेपणास्त्रांवर हल्ला करण्यासाठी नव्या पाणबुडी तयार करण्याचं काम करत आहे. अशा परिस्थितीत सॅटेलाइट इमेजमध्ये दिसणारी पाणबुडीही तशीच असू शकते, असा विश्वास अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात नमूद करण्यात आला होता.

मिसाइल लॉन्च ट्यूब आणि प्रपल्शन सिस्टमवर कव्हरखाजगी सॅटलाइट इमेजनरी कंपनी असलेल्या प्लॅनेट लॅब्स आणि सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये, चीनी पाणबुडी लिओनिंग प्रांतातील हुलुदाओ बंदरात कोरड्या गोदीत उभी असलेली दिसून येत आहे. बाहेर उभ्या असलेल्या या पाणबुडीचा बहुतांश भागही हिरव्या कापडानं झाकण्यात आला आहे. यामध्ये पाणबुडीच्या क्षेपणास्त्राची व्हर्टिकल लॉन्च ट्यूब आणि पाणबुडीच्या मागील बाजूस राहणाऱ्या अॅडव्हान्स प्रपल्शन सिस्टमचा समावेश आहे. चीन आपल्या नवीन पाणबुड्या खूप लपवून ठेवतो. चीनची नवी पाणबुडी अगदी खुल्या पद्धतीन दिसून येण्याी ही पहिलीच वेळ आहे.

टाइप ०९३ सारखी दिसते नवी पाणबुडी२४ एप्रिल ते ४ मे दरम्यान पाणबुडीला कोरड्या डॉकसाठी पाण्यातून बाहेर आणण्यात आले. यानंतर काढलेल्या छायाचित्रांमध्ये त्याच ठिकाणी पाणबुडी पाण्यात बुडालेली दिसत आहे. सिंगापूरचे संरक्षण तज्ज्ञ आणि एस. राजरत्नम स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचे प्रोफेसर कॉलिन कोह म्हणाले की, मार्गदर्शित क्षेपणास्त्रांसाठी व्हर्टिकल लॉन्च ट्यूबसह चीनी टाइप 093 "हंटर-किलर" पाणबुडीचा हा नवीन प्रकार असू शकतो. मात्र, या पाणबुडीचा क्लास अचूकपणे ओळखण्यासाठी सध्याच्या सॅटेलाईट इमेजेस अपुरी आहेत, असेही ते म्हणाले.

चीनची शस्त्रास्त्रांची भूक उघडमॉन्टेरी येथील मिडलबरी इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमधील शस्त्र नियंत्रणाचे प्राध्यापक जेफ्री लुईस म्हणाले की, ताज्या छायाचित्रांनी चीनचा पर्दाफाश केला आहे. मात्र, ही पाणबुडी नवीन श्रेणीची आहे की जुनी पाणबुडी अपग्रेड करण्यात आली आहे, हे अद्याप थेट सांगता येणार नाही. अमेरिकेच्या गुप्तचर अहवालानंतर चिनी पाणबुडीबद्दल सर्वांची उत्सुकता नक्कीच वाढली आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :chinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय