दी ब्रायन लारा स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर स्टॅण्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2017 18:19 IST2017-04-28T17:36:35+5:302017-04-28T18:19:40+5:30
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे चाहते जगभरात आहेत. निवृत्तीच्या चारवर्षानंतरही क्रिकेटरसिकांवरील सचिन नावाची जादू कमी झालेली नाही

दी ब्रायन लारा स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर स्टॅण्ड
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे चाहते जगभरात आहेत. निवृत्तीच्या चारवर्षानंतरही क्रिकेटरसिकांवरील सचिन नावाची जादू कमी झालेली नाही. वेस्ट इंडिजमध्ये दी ब्रायन लारा स्टेडियम तयार झाले आहे. या स्टेडियममधील एका स्टॅण्डला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे नाव देण्यात आले आहे.
वेस्ट इंडिजचा महान माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा याच्या नावाने त्रिनिदादमध्ये उभारण्यात आलेल्या ैदी ब्रायन लाराह्ण या स्टेडियमचे लवकरच उद्घाटन होणार आहे. लारा इलेव्हन आणि सचिन इलेव्हन या सामन्याने स्टेडियमचे उदघाटन करण्यात येईल. लारा आणि तेंडुलकर हे एकाच दशकात खेळलेले महान फलंदाज आहेत. वेगवेगळ्या देशाचे प्रतिनिधीत्व केलेले असूनही त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत.
नव्वदीच्या दशकात दोघांची तुलना देखील केली गेली. परंतु एकमेकांकडे या दोघांनी केव्हाच स्पर्धक म्हणून पाहिले नाही. संघाला विजय मिळवून देण्यासाठीची धडपड आणि त्यातून झालेल्या सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर सचिन, लाराने नव्वदीचे दशक गाजविले. टी अँड टी स्पोर्ट्स चे चेअरमन मायकल फिलिप्स यांनी सांगितले की, ब्रायन लाराच्या सल्ल्यानुसार स्टेडियममधील एका स्टॅण्डला सचिन तेंडुलकरचे नाव देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. स्टेडियम आणि अकादमी संबंधांतील नियमांच्या निर्णय प्रक्रियेत आम्ही लाराचा समावेश केला आहे.