शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

Pandora Papers Leak : पनामानंतर आता पँडोरा पेपर्स लीक; सचिन तेंडुलकर, अनिल अंबानींसह ३०० भारतीयांची नावं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 08:52 IST

Pandora Papers Leak : ICIJ नं पँडोरा पेपर्स लीकद्वारे आर्थिक रहस्य आणि टॅक्स चोरीचं सत्य समोर आणलं आहे. यामध्ये ७०० पाकिस्तानी लोकांचाही समावेश आहे.

ठळक मुद्देICIJ नं पँडोरा पेपर्स लीकद्वारे आर्थिक रहस्य आणि टॅक्स चोरीचं सत्य समोर आणलं आहे. यामध्ये ७०० पाकिस्तानी लोकांचाही समावेश आहे.

पाच वर्षांपूर्वी पनामा पेपर  (Panama Paper) लीकनं जगभरातील अनेकाना मोठा धक्का दिला होता. या पेपर लीकमधून अनेक बड्या व्यक्तींच्या बनावट कंपन्या आणि कर चोरीची प्रकरणं समोर आली होती. परंतु आता पुन्हाएकदा ICIJ नं (इंटरनॅशनल कन्सोर्टिअम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट) आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. याचा पर्दाफाश केल्यानंतर भारतातील बड्या व्यक्तींनी त्यावर तोडगा काढण्यास सुरूवात केली होती. विशेष म्हणजे यामध्ये भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि उद्योजक अनिल अंबानी यांच्या नावाचाही समावेश आहे. 

जगभरातील १.१९ कोटी दस्तऐवजांची माहिती शोधल्यानंतर ही आर्थिक रहस्य जगासमोर आणलं आहे. ICJI नं दिलेल्या माहितीनुसार पँडोरा पेपरच्या तपासात ११७ देशांतील ६०० रिपोर्टर्सचा समावेश होता. इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार अनिल अंबानी यांनी ब्रिटनच्या न्यायालयात स्वत:ला दिवाळखोर घोषित केलं होतं, त्यांच्याकडेही परदेशात १८ कंपन्या असल्याचं म्हटलं आहे.सचिन तेंडुलकरचं नाव का आलं?पंजाब नॅशनल बँकेत हजारो कोटींचा घोटाळा करणाऱ्या नीरव मोदीच्या बहीणीनं त्याच्या पलायनाच्या एका महिन्यापूर्वी एक ट्रस्ट तयार केला होता. तसंच पनामा पेपर्स लीकनंतर अनेक भारतीयांनी आपली संपत्ती रिऑर्गनाईज करण्यास सुरूवात केल्याचं अहवालात नमूद केलं होतं. तसंच या अहवालानुसार दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनंदेखील लीकच्या तीन महिन्यानंतर ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमधील आपली संपत्ती विकण्याचे प्रयत्न केल्याचं सांगण्यात आलं आहे.रिपोर्टनुसार यामध्ये ३०० पेक्षा अधिक भारतीय नावांचा समावेश आहे. त्यापैकी ६० जणांविरोधात अनेक पुरावे जमा करण्यात आले असून तपासही करण्यात आला आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये याबाबत गौप्यस्फोट केला जाणार आहे.

माजी कर आयुक्तांचाही समावेशयापैकी अनेकांच्या विरोधात पहिल्यापासून तपास सुरू आहे, तर काहींवर कारवाईचा बडगाही उचलण्यात आला आहे. दरम्यान, या यादीत काही माजी खासदारांच्या नावाचाही समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजे कर चोरीशी निगडीत १४ सेवा प्रदातांच्या दस्तऐवजांमध्ये अशाही लोकांचं नाव आहे ज्यांचं काम हे थांबवणं होतं. यामध्ये माजी रेव्हेन्यू सर्व्हिस ऑफिसर, माजी कर आयुक्त आणि मादी सैन्य अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. 

आणखी कोणाची नावं?यामध्ये केवळ भारतच नाही तर जगभरातील अनेक लोकांच्या नावांचा समावेश आहे. यामध्ये जॉर्डनचे राजा, युक्रेन, केनया, इक्वाडोरचे राष्ट्राध्यक्ष, झेक प्रजासत्ताकचे पंतप्रधान आणि ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेयर यांचाही समावेश आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे काही मंत्री आणि भारत, रशिया, अमेरिका, मेक्सिकोसह१३० अब्जाधिशांची नावंही यातून समोर आली आहे. याशिवाय पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या मंत्र्यांपासून त्यांच्या निकवर्तीयांची अशी ७०० जणांची नावंही यात आहे. 

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडुलकरAnil Ambaniअनिल अंबानीIndiaभारतEnglandइंग्लंडrussiaरशिया