रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 08:46 IST2025-10-15T08:33:22+5:302025-10-15T08:46:19+5:30
रशियन सैन्याने युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर खार्किव्हला लक्ष्य केले. रात्री त्यांनी शक्तिशाली ग्लाइड बॉम्ब आणि ड्रोन हल्ले केले, यामध्ये एका रुग्णालयावर हल्ला झाला, या हल्ल्यात सात लोक जखमी झाले.

रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
रशियन सैन्याने युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर खार्किव्हला लक्ष्य केले. रात्रभर त्यांनी शक्तिशाली ग्लाइड बॉम्ब आणि ड्रोन हल्ले केले, एका हॉस्पिटलवर हल्ला झाला. यामध्ये सात लोक जखमी झाले. एका पॉवर प्लांटचेही नुकसान झाले, यामुळे सुमारे ३०,००० लोकांचा वीजपुरवठा खंडित झाला.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की शुक्रवारी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत, तर दुसरीकडे हा हल्ला झाला. त्यांच्यातील चर्चा लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांवर केंद्रित असण्याची शक्यता आहे. युक्रेनला दीर्घ पल्ल्याच्या टोमाहॉक क्षेपणास्त्रांची खूप दिवसांपासून मागणी आहे.
मृत्यूनंतर तरी सन्मान द्या, तमाशा बंद करून न्याय द्या!
प्रादेशिक प्रमुख ओलेह सिनिहुबोव्ह यांनी मंगळवारी सांगितले की, युक्रेनच्या ईशान्य खार्किववर रशियाच्या हल्ल्यात शहराच्या मुख्य रुग्णालयाला लक्ष्य करण्यात आले. परिणामी पन्नास रुग्णांना बाहेर काढावे लागले.
दरम्यान, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी याबाबत टेलिग्रामवर माहिती दिली. ते म्हणाले की, हे हल्ले प्रामुख्याने वीज प्रकल्पांना लक्ष्य करत होते. त्यांनी नुकसानीबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. दररोज रात्री, रशिया आमच्या वीज प्रकल्पांना, वीज वाहिन्या आणि गॅस प्रकल्पांना लक्ष्य करत आहे.
त्यांनी इतर देशांना रशियाच्या लांब पल्ल्याच्या हल्ल्यांना रोखण्यासाठी अधिक हवाई संरक्षण प्रणाली प्रदान करण्याचे आवाहन केले आहे. झेलेन्स्की म्हणाले, "आम्हाला अमेरिका, युरोप, G7 आणि या प्रणाली असलेल्या सर्व भागीदारांवर विश्वास आहे की ते आमच्या लोकांचे रक्षण करण्यासाठी त्या पुरवतील."
युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी मंगळवारी ओडेसाचे महापौर हेनाडी ट्रुखानोव्ह यांचे नागरिकत्व रद्द केले. युक्रेनच्या सुरक्षा सेवेने सांगितले की, ट्रुखानोव्ह हे रशियन नागरिक असल्याने हे पाऊल उचलण्यात आले.