शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

Russia Ukraine Conflict: युक्रेनवर हल्ला करता-करता स्वीडनमध्ये शिरली रशियाची लढाऊ विमानं, युरोपीयन देशांमध्ये उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2022 5:38 PM

यापूर्वी, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी, नाटोमध्ये गेल्यास स्वीडन आणि फिनलँड सारख्या देशांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दिला आहे...

रशिया-युक्रेन युद्ध सुरू असतानाच स्वीडनने मोठा आरोप केला आहे. रशियाची चार लढाऊ विमानं बुधवारी आपल्या हवाई हद्दीत शिरल्याचे स्वीडनचे म्हणणे आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू असतानाच घडलेल्या या घटनेने युरोपीय देशांत खळबळ उडाली आहे. यापूर्वी, युक्रेननंतर युरोपातील इतर देशांवरही हल्ले होण्याची शक्यता वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत स्वीडनमध्ये रशियाची लढाऊ विमानं शिरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 

स्वीडनने जारी केलेल्या एका निवेदनानुसार, दोन सुखोई-27 आणि दोन सुखोई-24 या लढाऊ विमानांनी अचानकपणे स्वीडनच्या हवाई हद्दीत प्रवेश केला होता. तत्पूर्वी, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी, नाटोमध्ये गेल्यास स्वीडन आणि फिनलँड सारख्या देशांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दिला आहे. यानंतर ही घटना घडली आहे.

यासंदर्भात बोलताना स्वीडिश एयरफोर्सचे चीफ कार्ल जोहान अॅड्सट्रॉम म्हणाले, 'सध्याच्या एकूण परिस्थितीमुळे या घटनेसंदर्भात आम्ही अत्यंत चिंतित आहोत. रशियाकडून घडलेली ही घटना, अत्यंत अनप्रोफेशनल आणि बेजबाबदारपणाची आहे.' तसेच, या घटनेनंतर स्वीडिश फोर्सेस तत्काळ सक्रिय झाल्या होत्या. त्यांनी स्वीडिश फायटर जेट्सकडून रशियन लढाऊ विमानांचे फोटोही घेतले आहेत, असेही या निवेदनात म्हणण्यात आले आहे.

आमची तयारी उत्तम होती - स्वीडिश हवाई दलाचे प्रमुख म्हणाले, यावरून स्पष्ट झाले आहे की, आमची तयारी उत्तम होती. आम्ही आमच्या सुरक्षिततेचे आणि अखंडतेचे रक्षण करण्यासाठी तयार आहोत. याशिवाय, 'रशियाकडून स्वीडनच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले आहे. हे कदापी स्वीकार केले जाऊ शकत नाही,' असे स्वीडनचे संरक्षणमंत्री पीटर हुल्तक्विस्ट यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाfighter jetलढाऊ विमानairforceहवाईदलrussiaरशिया