रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 18:27 IST2026-04-09T18:27:04+5:302026-04-09T18:27:38+5:30

Russian Submarines in British Sea: रशियन पाणबुड्यांना ब्रिटन आणि नॉर्वेने चोख प्रत्युत्तर दिले आहे. संरक्षण मंत्री जॉन हीली यांनी या गुप्त लष्करी ऑपरेशनचा खुलासा केला.

Russian Submarines in British Sea: What were Russian submarines doing hiding in British waters for a month? British claim creates stir... | रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...

रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...

युक्रेन, इराण युद्धाच्या धगधगत्या वादात आता समुद्राच्या तळाशी एक नवे 'कोल्ड वॉर' सुरू झाले आहे. उत्तर अटलांटिक महासागरात रशियन पाणबुड्यांच्या संशयास्पद हालचाली अचानक वाढल्याने खळबळ उडाली आहे. या गंभीर परिस्थितीला प्रत्युत्तर म्हणून ब्रिटन आणि नॉर्वेने एक संयुक्त 'हाय-टेक' सैन्य ऑपरेशन राबवून रशियन नौदलाला माघार घेण्यास भाग पाडले आहे.

ब्रिटनचे संरक्षण मंत्री जॉन हीली यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर अटलांटिक क्षेत्रात रशियन पाणबुड्यांची सक्रियता कमालीची वाढली होती. हे क्षेत्र केवळ भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे नसून, संपूर्ण युरोपची 'लाईफलाईन' इथेच विसावली आहे. या समुद्राच्या तळाशी मोठ्या इंटरनेट केबल्स आणि ऊर्जा पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन्सचे जाळे पसरलेले आहे. या भागात रशियाच्या पाणबुड्या महिनाभरापासून लपून राहिल्या होत्या. 

ब्रिटन आणि नॉर्वेचा 'तगडा' पवित्रा
रशियाचा धोका ओळखून ब्रिटनने तात्काळ आपल्या विशेष पाणबुड्या तैनात केल्या. या ऑपरेशनमध्ये नॉर्वेने ब्रिटनला पूर्ण साथ दिली. ब्रिटीश नौदलाला स्पष्ट आदेश देण्यात आले होते की, रशियन हालचालींचा मागोवा घ्या आणि त्यांच्या कोणत्याही चुकीच्या कृतीला चोख प्रत्युत्तर द्या. या प्रचंड दबावानंतर, रशियन पाणबुड्यांनी ब्रिटनच्या समुद्री हद्दीतून काढता पाय घेत उत्तर दिशेला पलायन केले आहे.

युरोपला कशाची भीती?
तज्ज्ञांच्या मते, रशियाचा उद्देश या केबल्स किंवा पाईपलाईन्सना इजा पोहोचवणे असू शकतो. जर इंटरनेट केबल्स कापल्या गेल्या, तर संपूर्ण युरोपचा संपर्क जगापासून तुटू शकतो. तसेच, गॅस पाईपलाईन्सना लक्ष्य केल्यास ऊर्जेचे संकट ओढवू शकते. या ऑपरेशनदरम्यान कोणत्याही पायाभूत सुविधांचे नुकसान झाले नसल्याचे जॉन हीली यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title : रूसी पनडुब्बियां एक महीने तक ब्रिटेन के पास छिपी रहीं: दावे से चिंता बढ़ी

Web Summary : रूसी पनडुब्बियां एक महीने तक ब्रिटेन के जलक्षेत्र के पास छिपी रहीं, जिससे महत्वपूर्ण पानी के नीचे के केबलों और पाइपलाइनों को संभावित नुकसान होने का डर बढ़ गया है। ब्रिटेन और नॉर्वे के संयुक्त अभियान ने रूसी नौसेना को पीछे हटने पर मजबूर कर दिया।

Web Title : Russian Submarines Hide Near Britain for a Month: A Claim Raises Concerns

Web Summary : Tensions rise as Russian submarines lurked near Britain's waters for a month, raising fears of potential damage to vital undersea cables and pipelines. A joint operation by Britain and Norway forced the Russian navy to retreat.