रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत बोलण्यासाठी उत्सुक; अमेरिकेच्या ऑफरवर क्रेमलिन यांचे विधान आले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 19:42 IST2025-01-24T19:40:53+5:302025-01-24T19:42:18+5:30
अमेरिकेतील निवडणुकीवेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन युद्ध संपवण्याबाबत विधान केली होती. आता शपथविधीनंतर ट्रम्प त्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत बोलण्यासाठी उत्सुक; अमेरिकेच्या ऑफरवर क्रेमलिन यांचे विधान आले
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. जगभरातून अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. आता अमेरिका आणि रशियामधील संबंध पुन्हा रुळावर येऊ शकतात, कारण रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलण्यास तयार आहेत. याबाबत अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी त्यांना लवकरात लवकर पुतिन यांच्याशी बोलायचे आहे, असे ट्रम्प यांनी गुरुवारी एका निवेदनात म्हटले होते.
कंगाल पाकिस्तानवर युद्धाचे ढग, नव्या युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता; विश्लेषकांच्या दाव्याने खळबळ
डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी करण्याची तसेच अण्वस्त्रे कमी करण्यावर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, जेणेकरून जागतिक स्तरावर तणाव कमी करता येईल.
रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या वतीने, क्रेमलिन यांनी म्हटले आहे की, पुतिन ट्रम्प यांच्याशी चर्चा करण्यास पूर्णपणे तयार आहेत आणि ते देखील त्यांना भेटण्यास उत्सुक आहेत. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, मला खरोखरच अशी इच्छा आहे की मी लवकरात लवकर पुतिन यांना भेटू शकेन जेणेकरून युद्ध संपेल.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, हे युद्ध लाखो लोकांचे जीवन उद्ध्वस्त करत आहे. मी जे ऐकले आहे त्यावरून मला वाटते की पुतिन देखील मला भेटू इच्छितात आणि आपण लवकरच बोलणार आहोत. युद्धात सैनिक मारले जात आहेत, ही एक दुर्दैवी परिस्थिती आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा दावा केला होता की जर त्यांचा कार्यकाळ सुरू झाला तर त्यांच्या पहिल्याच दिवशी युक्रेन आणि रशियामध्ये करार होईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी २० जानेवारी रोजी पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली आहे. हे युद्ध संपवण्यासाठी आणखी काही महिने लागू शकतात, असं बोलले जात आहे.