शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

ट्रम्प-किम भेटीच्या पार्श्वभूमीवर रशियाचे परराष्ट्रमंत्री उत्तर कोरियात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 14:18 IST

अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे शासक किम जोंग उन यांची 12 जून रोजी सिंगापूर येथे भेट होणार आहे.

सेऊल- अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे शासक किम जोंग उन यांची 12 जून रोजी सिंगापूर येथे भेट होणार आहे. गेल्या वर्षी एकमेकांना आव्हाने देणारे हे नेते आता शांततेची बोलणी करण्यास भेटण्याची ही अभूतपूर्व वेळ असेल. त्यामुळे या भेटीकडे जगातील सर्व देशांचे आणि नेत्यांचे लक्ष आहे. त्यापार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय राजकारणात वेगाने हालचाली होत आहेत. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्रोव एका दिवसाच्या दौऱ्यासाठी उत्तर कोरियात दाखल झाले आहेत.

उत्तर कोरियाचे परराष्ट्रमंत्री री योंग हो यांच्या आमंत्रणावरून सर्जेई लॅव्रोव डेमोक्रॅटिक पिपल्स रिपब्लिक ऑफ चायना (उत्तर कोरिया)मध्ये दाखल झाले आहेत अशी माहिती एसीएनए यावृत्तसंस्थेने दिली आहे. सर्जे लॅव्रोव यांनी उत्तर कोरियाच्या परराष्ट्रमंत्र्यांशी प्योंगयांग (उत्तर कोरियाची राजधानी) मध्ये असेम्ब्ली इमारतीमध्ये चर्चा सुरु केली आहे. मात्र त्याबद्दल कोणतीही माहिती कोरियन वृत्तसंस्थेने दिलेली नाही. 2009 नंतर लॅव्रोव यांची ही पहिलीच उत्तर कोरिया भेट आहे. लॅव्रोव यांनी अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट माइक पोम्पेओ यांच्याशी काल फोनवरुन चर्चा केली.उत्तर कोरियाचे उच्चपदस्थ नेते अमेरिकेतबुधवारी रात्री उत्तर कोरियाचे काही उच्चपदस्थ अधिकारी अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट माईक पोम्पेओ यांची भेट घेतली. या भेटीमध्ये उत्तर कोरियाचे नेते किम योंग चोल यांचाही समावेश होता. किम योंग चोल हे किम जोंग उन याचे उजवा हात मानले जातात. तसेच गेल्या 18 वर्षांमध्ये अमेरिकेत जाणारे ते सर्वात उच्चपदस्थ वरिष्ठ नेते आहेत. मॅनहॅटन येथे पोम्पेओ यांच्यासोबत त्यांनी जेवण घेतले आणि अर्धा तास चर्चा केली.

आज गुरुवारीही त्यांच्या दोन बैठका होणार आहेत. गेल्या महिन्यात उत्तर कोरियाचे शासक किम जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे पंतप्रधान मून जाए इन यांची भेट झाली होती. सुमारे 50 वर्षांचा शीतयुद्धाचा काळ दोन्ही देशांनी अनुभवल्यानंतर त्यांच्यामध्ये झालेली ही भेट जागतिक शांततेसाठी महत्त्वाची मानली जाते. या दोन्ही देशांच्या नेत्यांनी आगामी काळामध्ये कोरिया द्वीपकल्पावरुन अण्वस्त्रे नष्ट करण्याचा मनोदय व्यक्त केला आणि त्या दिशेने प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. याबरोबरच उत्तर कोरियाने आपण नष्ट करत असलेल्या अणूप्रकल्पाच्या स्थळा भेट देण्याची परदेशी पत्रकारांना परवानगीही दिली. 

टॅग्स :Kim-Trump Summit Singaporeकिम-ट्रम्प भेट सिंगापूरrussiaरशियाnorth koreaउत्तर कोरिया