Russia vs Ukraine War: रशियन सैनिक बलात्कार करून तरुणींना जीवे मारताहेत; खासदारानं शेअर केले हृदयद्रावक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 08:22 IST2022-04-05T08:17:27+5:302022-04-05T08:22:10+5:30

Russia vs Ukraine War: रशियन सैनिकांचे युक्रेनी तरुणींवर अमानुष अत्याचार; अनेकींची बलात्कार करून हत्या

Russia vs Ukraine War swastika shaped burns russian soldiers raped and branded girls shows gory image | Russia vs Ukraine War: रशियन सैनिक बलात्कार करून तरुणींना जीवे मारताहेत; खासदारानं शेअर केले हृदयद्रावक फोटो

Russia vs Ukraine War: रशियन सैनिक बलात्कार करून तरुणींना जीवे मारताहेत; खासदारानं शेअर केले हृदयद्रावक फोटो

कीव्ह: रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू होऊन ४० दिवस उलटले आहेत. अद्याप युद्ध थांबलेलं नाही. या युद्धामुळे युक्रेनचं अतोनात नुकसान झालं आहे. रशियन सैनिकांनी युक्रेनमधील अनेक निष्पाप तरुणींवर आणि अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचे प्रकार समोर आले आहेत. रशियन सैनिकांनी १० वर्षांच्या मुलींवर बलात्कार करून त्यांच्या शरीरावर स्वस्तिकसारखं चिन्ह काढल्याचा दावा युक्रेनच्या खासदार लेसिया वासिलेंक यांनी केला आहे. त्यांनी काही फोटोदेखील ट्विट केले आहेत.

रशियन सैनिक बलात्कार करून तरुणींना, मुलींना जीवे मारत आहेत. ज्या महिलांच्या हत्या करण्यात आल्या आहेत, त्यांच्या शरीरावर स्वस्तिकच्या आकाराच्या भाजल्याच्या खुणा दिसून आल्याचं वासिलेंक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी हॅशटॅग #StopGenocide #StopPutinNOW वापरले आहेत. रशियन सैनिक लुटतात, बलात्कार करतात आणि मारतात, असं म्हणत त्यांनी काही फोटो ट्विट केले आहेत. 

रशियन सैनिक युक्रेन नागरिकांच्या जाणुनबुजून हत्या करत असल्याचे पुरावे समोर आले आहेत. त्यामुळे रशियावर चौफेर टीका झाली आहे. रशियावर आणखी निर्बंध घालण्याची भूमिका पश्चिमेकडील देशांनी घेतली आहे. तसं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलं आहे. युरोपियन युनियननं रशियाकडून होणाऱ्या नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यावर निर्बंध लादावेत, असा सल्ला जर्मनीच्ा संरक्षण मंत्र्यांनी दिला आहे.

युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी कीव्हच्या आसपास ४१० नागरिकांचे मृतदेह आढळून आले आहेत. काही दिवसांपूर्वीच कीव्ह शहर रशियन सैन्यानं ताब्यात घेतलं होतं. राजधानीपासून जवळ असलेल्या बुचामध्ये २१ मृतदेह आढळून आले. त्यापैकी ९ मृतदेह एकाच ठिकाणी होते. त्या ९ जणांवर अतिशय जवळून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यातल्या दोन जणांचे हात मागे बांधण्यात आले होते. 

Web Title: Russia vs Ukraine War swastika shaped burns russian soldiers raped and branded girls shows gory image