Russia vs Ukraine War: फुटबॉलच्या मैदानाच्या आकाराचं जहाज, लपवू तरी कुठे? पुतीन यांच्या उद्योगपती मित्राची झोप उडाली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 13:51 IST2022-03-06T19:58:53+5:302022-03-07T13:51:52+5:30
Russia vs Ukraine War: रशियाच्या उद्योगपतींची एकच धावाधाव; पुतीन यांचे निकटवर्तीय अडचणीत

Russia vs Ukraine War: फुटबॉलच्या मैदानाच्या आकाराचं जहाज, लपवू तरी कुठे? पुतीन यांच्या उद्योगपती मित्राची झोप उडाली
मॉस्को: रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू होऊन दीड आठवडा उलटला आहे. युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियावर अमेरिका आणि युरोपियन देशांनी अनेक निर्बंध लादले आहेत. युक्रेन युद्धाचे परिणाम रशियातील बड्या उद्योगपतींना भोगावे लागत आहेत. रशियन उद्योगपतींच्या अमेरिकेत असलेल्या लक्झरी यॉट आणि अपार्टमेंट ताब्यात घेण्याच्या सूचना अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी केल्या आहेत.
रशियाचे अब्जाधीश उद्योगपती त्यांच्या लक्झरी क्रूझसाठी सुरक्षित जागा शोध आहेत. रशियन उद्योगपती एलिशर उस्मानोव यांच्या मालकीचं 'दिलबर' जहाज फुटबॉलच्या मैदानाच्या आकाराचं आहे. त्यावर दोन हेलिपॅड, १३० प्रवाशांच्या राहण्याची सोय आहे. हे जहाज २०१६ मध्ये तयार करण्यात आलं. त्यासाठी जवळपास ६४.८ कोटी रुपये खर्च आला.
अमेरिका आणि युरोपियन युनियननं रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचे निकटवर्तीय उस्मानोववर निर्बंध लादण्याची घोषणा केली. रशियन उद्योगपतींच्या लक्झरी क्रूझ, खासगी विमानं, अपार्टमेंट्स जप्त करण्याचे आदेश बायडन यांनी दिले आहेत. रशियन उद्योगपती वर्षानुवर्षे त्यांचा पैसा आणि संपत्ती पाश्चिमात्य सरकारपासून लपवत आले आहेत. त्यांना दणका देण्याची तयारी अमेरिकेनं सुरू केली आहे.