रशिया-युक्रेन युद्ध लवकरच थांबणार? ट्रम्प-पुतिन यांची फोनवर चर्चा, लवकरच तोडगा निघणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 22:04 IST2025-03-18T22:03:34+5:302025-03-18T22:04:15+5:30
Russia-Ukraine : रशिया-युक्रेन युद्धात दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे.

रशिया-युक्रेन युद्ध लवकरच थांबणार? ट्रम्प-पुतिन यांची फोनवर चर्चा, लवकरच तोडगा निघणार...
Russia-Ukraine : मागील दोन-तीन वर्षांपासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध लवकरच थांबण्याची चिन्हे आहेत. हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मध्यस्थी करत आहेत. आज त्यांनी रशियाचे प्रमुख व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा केली. युक्रेनमध्ये युद्धविरामासाठी अमेरिकेने दिलेल्या प्रस्तावानंतर हे पहिलेच संभाषण होत आहे. व्हाईट हाऊसच्या मते, सकाळी 10:00 AM ET (7:30PM IST) वाजता हा कॉल सुरू झाला असू, चर्चा अजूनही सुरू आहे.
झेलेन्स्की सहमत, परंतु पुतिन...
गेल्या आठवड्यात सौदी अरेबियात परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चर्चेनंतर युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या प्रस्तावांना सहमती दर्शवली होती. पण, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की अजूनही पुतिन शांततेसाठी तयार आहेत की नाही, याबद्दल शंका घेत आहेत. याचे कारण म्हणजे, रशियन सैन्य अजूनही युक्रेनवर हल्ले करत असल्याचा दावा झेलेन्स्की करत आहेत.
व्हाईट हाऊस आशावादी
व्हाईट हाऊसने या चर्चेबद्दल आशावाद व्यक्त केला आहे, तर युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की पुतीन यांच्या हेतूबद्दल साशंक आहेत. दरम्यान, युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांमध्ये ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील या संवादाकडे एक महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.