शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Russia Ukraine War: "आम्ही पुतीन यांच्याशी चर्चेस तयार", युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांचं शांतता चर्चेबाबत मोठं विधान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 21:31 IST

Russia Ukraine War: रशियासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर जेलेन्स्की (Ukrainian President Volodymyr Zelenskyy) यांनी शांतता चर्चेबाबत (peace talks) मोठं वक्तव्य केलं आहे.

Russia Ukraine War: रशियासोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर जेलेन्स्की (Ukrainian President Volodymyr Zelenskyy) यांनी शांतता चर्चेबाबत (peace talks) मोठं वक्तव्य केलं आहे. युक्रेन रशियासोबत करार करण्यास तयार असल्याचं ते म्हणाले आहेत. आम्ही रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चेसाठी तयार आहोत, असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की म्हणाले आहेत. चर्चा करण्यास नकार देणं म्हणजे हे तिसऱ्या महायुद्धाचं लक्षण ठरू शकतं, असं जेलेन्स्की म्हणाले. रशियन सैन्य युक्रेनमधील निवासी भागांना सतत लक्ष्य करत आहे. रशियन हल्ल्यामुळे युक्रेन जवळजवळ उद्ध्वस्त झाले आहे. पण युक्रेनचं सैन्य हार मानायला तयार नाही. युक्रेनचं सैन्य खंबीरपणे रशियन सैनिकांना तोंड देत आहे. 

दोन्ही देशांमधील हे युद्ध कधी संपेल हे सांगणे कठीण असले तरी या युद्धात रशियाचंही मोठं नुकसान झालं आहे. युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयानं रविवारी केलेल्या दाव्यानुसार 20 मार्चपर्यंत 14,700 रशियन सैनिक मारले गेले आहेत. याशिवाय मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या युद्धात आतापर्यंत रशियाची अनेक शस्त्रं नष्ट झाली आहेत. 118 रशियन हेलिकॉप्टर, 96 विमानं आणि 476 रणगाड्यांसह अनेक शस्त्रं नष्ट करण्यात आल्याचा दावा मंत्रालयानं केला आहे. दोन्ही देशांदरम्यान चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत, परंतु युद्धबंदीबाबत कोणताही ठोस तोडगा निघू शकला नाही. त्याचवेळी, संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार, युक्रेनमधील युद्धामुळे आतापर्यंत 65 लाखांहून अधिक लोकांनी देश सोडला आहे.

जेलेन्स्की यांनी केलं शांतता आणि सुरक्षेच्या चर्चेचं आवाहनयुक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी शनिवारी रशियासोबत शांतता आणि सुरक्षा चर्चेसाठी आवाहन केलं होतं. रशियाला आपल्या चुकांमुळे होणारे नुकसान मर्यादित करण्याची ही एकमेव संधी आहे, असं जेलेन्स्की म्हणाले होते. युक्रेनच्या अधिकार्‍यांशी वाटाघाटी करणार्‍या रशियन शिष्टमंडळाचे प्रमुख म्हणाले की, दोन्ही बाजू युक्रेनच्या तटस्थ स्थितीबाबत कराराच्या जवळ आहेत. युक्रेनच्या नाटोमध्ये सामील होण्याच्या आणि तटस्थ भूमिका घेण्याच्या प्रयत्नांवरून दोन्ही बाजू मतभेद दूर करण्याच्या जवळ जात आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जेलेन्स्कीचे कौतुक केलेयुक्रेनमध्ये रशियाच्या विशेष लष्करी कारवाईदरम्यान व्लादिमीर जेलेन्स्की आणि त्यांच्या कुटुंबाला ब्रिटनमध्ये आश्रय देण्याची ऑफर दिली आहे, असं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले. जेलेन्स्कीचे खूप चांगले व्यक्ती आहेत, परंतु ते देशासाठी एक प्रेरणास्रोत म्हणूनही सिद्ध झाले आहेत, असा कौतुकाचा वर्षाव देखील जॉन्सन यांनी केला होता. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाwarयुद्धVladimir Putinव्लादिमीर पुतिन