शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

Russia-Ukraine War: मोठी बातमी! रशियाकडे उरला फक्त १४ दिवस पुरेल इतका दारुगोळा, आता अणुयुद्धाची कुणकुण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 23:12 IST

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेनमधील युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे.

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेनमधील युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. युद्ध आता तिसऱ्या आठवड्यात पोहोचलं आहे. अद्याप रशियाला युक्रेनची राजधानी कीव्हवर पूर्णपणे ताबा मिळवता आलेला नाही. यातच ब्रिटिश एजन्सीच्या हवाल्यानं देण्यात आलेल्या माहितीनुसार रशियाकडे आता केवळ पुढील १४ दिवस पुरेल इतकाच दारुगोळा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे जितके दिवस युद्ध ताणलं जाईल तितकं रशियन सैन्याला कीव्हवर नियंत्रण मिळवणं कठीण होऊन बसणार आहे. त्यामुळे अणुहल्ल्याचे हे संकेत तर नाहीत ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

इतके दिवस युद्ध सुरू असून अजूनही कीव्हवर कब्जा करण्यात यश येत नसल्यानं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन संतापल्याचं सांगितलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर संतापलेल्या पुतीन यांच्याकडून अणुहल्ल्याचा निर्णय तर घेतला जाणार नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे. युक्रेन विरुद्धच्या युद्धाला आता इतके दिवस झाले आहेत की पुतीन यांनीही हे युद्ध इतके दिवस ताणलं जाऊ शकेल याची पुसटशीही कल्पना नव्हती. युक्रेनी सैन्य रशियाला निकराचा लढा देत आहेत. आता हे युद्ध जितके जास्त दिवस सुरू राहिल तितकं तिसऱ्या महायुद्धाची शक्यता आणखी गडद होत जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुतीन यांच्या निर्णयाचा काहीच अंदाज बांधला जाऊ शकत नाही. त्यामुळे अणुहल्ल्याची शक्यता बळावली आहे. 

संयुक्त राष्ट्रांनी दिलेला इशारा चिंताजनकयुक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी अण्वस्त्र सज्ज विभागालाही सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. म्हणजेच हे युद्ध कोणत्याही क्षणी अण्वस्त्र युद्धात रुपांतरीत होऊ शकतं, असं संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटिनिओ गुटेरेस यांनी म्हटलं आहे. यासोबतच युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल यांनीही या युद्धात नाटो सामील झाल्यास अण्वस्त्र महायुद्ध होण्याची भीती व्यक्त केली आहे. याआधीच रशियाने जगभरातील देशांना धमकीच दिली आहे. युक्रेनच्या बाबतीत अमेरिका किंवा नाटो देश आल्यास त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतील, असे पुतीन यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाwarयुद्धVladimir Putinव्लादिमीर पुतिन