शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

Russia-Ukraine War: रशियात अंतर्गत विरोधाला सामोरं जाणाऱ्या पुतीन यांनी उघडली तिजोरी!, सैनिकांसाठी केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 09:28 IST

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाला आता दहा दिवस उलटून गेले आहेत. दोन्ही देशांकडून परस्परांचे हजारो सैनिक मारल्याचा दावा करण्यात आला आहे.

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाला आता दहा दिवस उलटून गेले आहेत. दोन्ही देशांकडून परस्परांचे हजारो सैनिक मारल्याचा दावा करण्यात आला आहे. युद्धात शहीद झालेल्या सैनिकांचा आकडा हजारोंच्या घरात असला तरी त्याचा नेमका आणि अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नाही. यातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युद्धाच्या ११ व्या दिवशी शहीद जवानांसाठी मोठी घोषणा केली आहे. युक्रेन विरुद्धच्या युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याची घोषणा पुतीन यांनी केली आहे. युद्धात शहीद झालेल्या प्रत्येक जवानाच्या कुटुंबीयांना ५ मिलियन रुबल (४० लाख रुपये) आणि जखमी जवानांसाठी ३ मिलियन रुबल (२४ लाख रुपये) आर्थिक मदत म्हणून जाहीर केले आहेत. 

मृत्यूंच्या संख्येवरुन दोन्ही देशांचे वेगवेगळे दावेअल-जजीराच्या रिपोर्टनुसार रशियन संरक्षण मंत्रालयाकडून युद्धात मृत्यूमुखी पडलेल्यांची पहिली आकडेवारी समोर आली आहे. यातील नोंदीनुसार रशियाचे आतापर्यंत ४९८ सैनिक मारले गेले आहेत. तर १,५९७ सैनिक जखमी झाली आहे. काही दिवसांपूर्वी रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेनकोव यांनी मृतांच्या कुटुंबीयांना आवश्यक अशी सर्व आर्थिक मदत केली जाईल असं आश्वासन दिलं होतं. त्यांनी रशियानं युक्रेनच्या २,८७० हून अधिक सैनिक मारल्याचा दावा केला होता. तर ३,७०० सैनिक जखमी झाल्याचं ते म्हणाले होते. याशिवाय ५७२ सैनिकांना ताब्यात घेतल्याचीही माहिती त्यांनी दिली होती. दरम्यान, युक्रेननं रशियाचे कमीत कमी ४,५०० सैनिक मारल्याचा दावा केला आहे. 

रशियानं पाठवले ६३ हजाराहून अधिक सैनिकरशियानं युक्रेन विरोधात युद्धाची घोषणा केल्यानंतर तातडीनं हवाई हल्ल्यांच्या माध्यमातून कारवाई सुरू करण्यात आली होती. या संघर्षात रशियानं सुरुवातीला ६३ हजाराहून अधिक सैनिक तैनात केले होते. दरम्यान, युद्धात रशियाचे नेमके किती सैनिक मारले गेले याचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही. 

युक्रेन दरमहा देणार २.५० लाख रुपयेरशियानं हल्ला सुरू केल्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी आपल्या सैनिकांना दरमहा १,००,००० रिव्निया (युक्रेनी चलन) अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे. युक्रेनी लष्कराला मजबूत करण्यासाठी आवश्यक असे सर्व प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले होते.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाwarयुद्धVladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशिया