शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

युक्रेनमध्ये रशियाचा 'खूनी खेळ' सुरूच! आर्ट स्कूलवर अंदाधुंद बॉम्बचा वर्षाव, ढिगाऱ्यात 400 लोक गाडले जाण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2022 14:40 IST

रशियन लष्कराने युक्रेनियन बंदरातील मारियुपोल येथील एका कला विद्यालयावर बॉम्बहल्ला केला आहे. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 400 लोकांनी या ठिकाणी आश्रय घेतला होता.

रशियन लष्कराने युक्रेनियन बंदरातील मारियुपोल येथील एका कला विद्यालयावर बॉम्बहल्ला केला आहे. युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 400 लोकांनी या ठिकाणी आश्रय घेतला होता. रशियन बॉम्बहल्ल्यात शाळेची इमारत उद्ध्वस्त झाली असून ढिगाऱ्याखाली लोक अडकले असण्याची शक्यता आहे. मात्र जीवितहानीबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. रशियन लष्कराने बुधवारी मारियुपोलमधील एका थिएटरवरही बॉम्बहल्ला केला होता. येथेही नागरिकांनी आश्रय घेतला होता. येथून 130 जणांची सुटका करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र ढिगाऱ्याखाली अनेक लोक गाडले गेले आहेत.

मारियुपोल हे अझोव्ह समुद्रावरील एक मोक्याचे बंदर शहर आहे, ज्याला रशियन सैन्याने वेढा घातला आहे. शहरासाठी ऊर्जा, अन्न आणि पाण्याचा पुरवठा खंडित करण्यात आल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे. शिवाय, रशियन सैन्य शहरावर सतत बॉम्बहल्ला करत आहे. युक्रेनचे अध्यक्ष वेलोदिमीर जेलेन्स्की म्हणाले की, मारियुपोलच्या वेढ्याची इतिहासात नोंद केली जाईल. रशिया येथे खूप मोठा गुन्हा करत आहे. गेल्या महिनाभरापासून दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे आतापर्यंत लाखो लोकांनी युक्रेन सोडले आहे. या लोकांनी शेजारील देशांमध्ये आश्रय घेतला आहे.

रशियन सैन्याने मारियुपोलमध्ये प्रवेश केलारशियन सैन्य हळूहळू मारियुपोलचा ताबा घेत आहे. रशियन सैन्य मारियुपोलमध्ये शिरले आहे. येथे लढाई तीव्र झाली आहे. त्यामुळे मारियुपोल येथील सध्याचा स्टील प्लांट बंद करण्यात आला आहे. परिस्थिती इतकी बिघडत चालली आहे की स्थानिक अधिकाऱ्यांनी पाश्चात्य देशांकडून अधिक मदतीचे आवाहन केले आहे. मारियुपोल पोलीस अधिकारी मायकेल वर्शिनिन यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी पाश्चिमात्य नेत्यांना संबोधित करत जवळच रस्त्यावर पसरलेला ढिगारा दाखवला आहे. मारियुपोलमध्ये लहान मुले आणि वृद्धांचा मृत्यू होत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. शहर उद्ध्वस्त झालं आहे.

मारियुपोलमधून हजारो लोकांचे स्थलांतरयुक्रेनवर रशियन सैन्याने केलेल्या हल्ल्यांदरम्यान देशातील 10 पैकी आठ ह्युमॅनिटेरियन कॉरिडॉरमधून लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. आतापर्यंत 6,623 लोकांना बाहेर काढण्यात आले आहे, त्यापैकी 4,128 लोक मारियुपोलचे होते. या लोकांना झापोरिझिया येथे नेण्यात आलं आहे. रशियन सैन्यानं शहरातील हजारो लोकांना रशियात स्थायिक होण्यास भाग पाडल्याचा दावा मारियुपोल सिटी कौन्सिलनं केला आहे. "व्यावसायिक लोकांवर युक्रेन सोडून रशियन प्रदेशात जाण्यासाठी दबाव आणत आहेत," असा दावा युक्रेनियन अधिकाऱ्यांनी केला आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाwarयुद्धVladimir Putinव्लादिमीर पुतिन