शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Russia-Ukraine War : युद्धातून मागे हटणाऱ्या सैनिकांना गोळी घालण्याचा पुतिन यांचा आदेश! युक्रेन युद्धसंदर्भात मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2022 00:05 IST

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी, आपल्या सैनिकांना माघार घेण्यापासून रोखण्यासाठी, स्वतः मोर्चा साभाळला आहे...

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धातून माघार घेणाऱ्या सैनिकांना गोळी घालण्याचा आदेश दिला आहे. तसेच, यासाठी रशिया विशेष तुकडीही तैनात करत आहे, असा दावा ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी गुप्तचर विभागाच्या अहवालाचा हवाला देत केला आहे. एवढेच नाही, तर रशियन सैन्याचा युद्धातील उत्साह आणि त्यांचे मनोधैर्य कमी झाल्याने रशियाने असे पाऊल उचलले असल्याचेही ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेने म्हटले आहे.

इशाऱ्यानंतर शूट करण्याचा आदेश - युद्धातून मागे हटणाऱ्या सैनिकांविरोधात शस्त्राचा वापर करण्यात यावा, असा आदेश रशियन जनरलने आपल्या कमांडर्सना दिला आहे. एवढेच नाही, तर इशारा दिल्यानंतरही सैनिक ऐकण्यास तयार नसतील, तर त्यांना गोळी घालण्याचा आदेशही यात सामील आहे, असेही ब्रिटेनच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच, विविध रिपोर्ट्स आणि गुप्तचर विभागाच्या अपडेटनुसार, सप्टेंबर महिन्यात रशियाचा झालेला पराभव आणि युक्रेनने पुन्हा एकदा आपल्या भागांवर मिळवलेल्या कब्जा मुळे रशियन सैनिकांचे मनोबल ढासाळले आहे. 

पुतिन स्वत: सांभाळत आहेत मोर्चा -रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी, आपल्या सैनिकांना माघार घेण्यापासून रोखण्यासाठी, स्वतः मोर्चा साभाळला आहे. सप्टेंबर महिन्यात न्युयॉर्क टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तानुसार, खेरसान शहरात युक्रेनचा वाढता हस्तक्षेप पाहून रशियन सैनिकांनी राष्ट्रपती पुतिन यांना मागे हटण्याची विनंती केली होती. मात्र, पुतिन यांनी त्यांची ही विनंती फेटाळली होती. 

रशियाने युद्धातून माघार घेणाऱ्या सैनिकांच्या शिक्षेतही वाढ केली आहे. रशियाने सप्टेंबर महिन्यात एक विधेयक मंजूर केले असून या विधेयकाद्वारे युद्धातून माघार घेणाऱ्या सैनिकांची शिक्षा 5 वर्षांवरून 10 वर्षे करण्यात आली आहे. या शिक्षेच्या अंमलबजावणीची परवानगी देणाऱ्या डिक्रीवर पुतिन यांनी स्वाक्षरी करत बिलावर शिक्का मोर्तबही केले आहे.

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनRussia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाEnglandइंग्लंडSoldierसैनिक