शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेने युक्रेनमध्ये सैन्य पाठवले तर...व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2024 17:35 IST

Russia Ukraine War: गेल्या दोन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू आहे.

Russia Ukraine War: गेल्या दोन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरू आहे. सुरुवातीला रशियाने युक्रेनवर वर्चस्व मिळवले होत्, पण नंतर युक्रेनने पाश्चिमात्य देशांच्या मदतीने रशियावर पलटवार करण्यास सुरुवात केली. युक्रेन सातत्याने रशियाच्या लष्करी ठिकाणांवर ड्रोन हल्ले करत आहे. अशा परिस्थितीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी एक मोठा इशारा दिला आहे. व्लादिमीर पुतिन म्हणाले की, रशियाच्या सार्वभौमत्वाला किंवा स्वातंत्र्याला धोका निर्माण झाल्यास, ते अण्वस्त्रांचा वापर करायला मागे-पुढे पाहणार नाहीत.

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी बुधवारी युक्रेनसह पाश्चिमात्य देशांना पुन्हा एकदा अणुयुद्धाचा इशारा दिला. अमेरिकेने युक्रेनमध्ये सैन्य पाठवणे थांबवले नाही, तर हे युद्ध भडकवणारे कृत्य मानले जाईल. आम्हीदेखील अणुयुद्धासाठी तयार आहे, असा इशारा पुतिन यांनी दिला. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या या वक्तव्यामुळे युक्रेन आणि अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. 

एका स्थानिक वृत्त वाहिनीशी बोलताना पुतिन म्हणाले की, 'आगामी सहा वर्षांसाठी आम्ही सत्तेत असणार आहोत. सध्या युक्रेनमध्ये अण्वस्त्रे वापरण्याची गरज वाटत नाही, पण आम्ही कोणत्याही परिस्थितीसाटी तयार आहोत. अमेरिकेने रशियाच्या भूभागावर किंवा युक्रेनवर  सैन्य तैनात केले, तर रशिया कारावाई करेल', असा स्पष्ट इशारा पुतीन यांनी दिला. येत्या 15-17 मार्चदरम्यान रशियात सार्वत्रिक निवडणूका होत आहेत. या निवडणुकीत पुन्हा एकदा पुतिन यांचा विजय निश्चित मानला जातोय. 

दोन वर्षांपासून युद्ध सुरू गेल्या दोन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. या युद्धात रशियाने युक्रेनचा मोठा भूभाग ताब्यात घेतला आहे. युद्धामुळे रशियाचेही मोठे नुकसान झाले आहे. या संपूर्ण युद्धात दोन्ही बाजुचे हजारो सैनिक मारले गेले आहेत. एकीकडे बलाढ्य रशिया माघार घ्यायला तयार नाही, तर दुसरीकडे युक्रेनला अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देशांकडून लष्करी आणि आर्थिक मदत मिळत आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून हे युद्ध सुरू असून, यामुळे दोन्ही देशातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनAmericaअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीयwarयुद्ध