शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 16:26 IST

Russia-Ukraine: रशिया-युक्रेन युद्धाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत, पण अजून या दोन्ही देशांमधील संघर्ष शांत झालेला नाही.

Russia-Ukraine: रशिया-युक्रेन युद्धाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत, पण अजून या दोन्ही देशांमधील संघर्ष शांत झालेला नाही. उलट हे युद्ध दिवसेंदिवस धोकादायक होत चालले आहे. काही दिवसांपूर्वीच युक्रेनने रशियावर सर्वात मोठा ड्रोन हल्ला केला होता, त्याला रशियानेही तेवढ्यात ताकदीने प्रत्युत्तर दिले. एकीकडे युक्रेन रशियाच्या भूमीत घुसून हल्ले करत आहे, तर दुसरीकडे रशियन सैन्य युक्रेनियन शहरांवर सतत ताबा मिळवत आहे.

रशियन संरक्षण मंत्रालयाने रविवारी दावा केला की, त्यांच्या सैन्याने युक्रेनच्या डोनेस्तक प्रदेशातील झोरिया नावाची वस्ती ताब्यात घेतली आहे. या विजयासह रशियाने युक्रेनच्या सुमारे २० टक्के भूभागावर नियंत्रण मिळवले आहे. वॉर रिपोर्ट कार्ड-२०२५ आणि रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रशियन सैन्याने आतापर्यंत युक्रेनमधील १,१२,००० चौरस किलोमीटरपेक्षा जास्त भूभाग ताब्यात घेतला आहे. यामध्ये क्रिमिया, डोनेस्तक, लुहान्स्क, खेरसन आणि झापोरिझियाचा मोठा भाग सामील आहे. 

मंद पण स्थिर प्रगतीरशियाचे लष्करी यश अचानक घडलेले नाही. लष्करी विश्लेषकांचा असा विश्वास आहे की, रशिया आता पूर्व आणि दक्षिण युक्रेनमध्ये मंद पण स्थिर गतीने आपली पकड मजबूत करत आहे. झोर्यासारख्या लहान शहरांवर कब्जा करणे हा या रणनीतीचा एक भाग आहे. हा भाग अव्दिव्का आणि चासिव्ह यार दरम्यान आहे, जो दोन्ही बाजूंसाठी धोरणात्मकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे.

युक्रेनचे मर्यादित प्रत्युत्तर खेरसन आणि खार्किव सारख्या भागात युक्रेनला काही प्रमाणात यश मिळाले असले तरी, २०२४ च्या शेवटी आणि २०२५ च्या सुरुवातीला त्याच्या प्रत्युत्तरात्मक कारवाया मर्यादित सिद्ध झाल्या आहेत. रशिया आता केवळ आपला ताबा टिकवून ठेवण्यात यशस्वी झाला नाही, तर हळूहळू तो विस्तारतही आहे. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाVladimir Putinव्लादिमीर पुतिनwarयुद्ध