ड्रोन हल्ल्याचा बदला बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने..., पुतिन यांनी युक्रेनमध्ये लावली आग, ४ परदेशी नागरिकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 15:36 IST2025-03-12T15:36:10+5:302025-03-12T15:36:41+5:30

Russia Ukrain War: युक्रेनने रशियावर ड्रोनद्वारे हल्ला केल्यानंतर आता  रशियाने युक्रेनवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. रशियाने केलेल्या या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचे तसेच चार परदेशी नागरिकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.

Russia Ukrain War: In retaliation for the drone attack, Putin launched a ballistic missile..., setting fire to Ukraine, 4 foreign nationals dead | ड्रोन हल्ल्याचा बदला बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने..., पुतिन यांनी युक्रेनमध्ये लावली आग, ४ परदेशी नागरिकांचा मृत्यू

ड्रोन हल्ल्याचा बदला बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने..., पुतिन यांनी युक्रेनमध्ये लावली आग, ४ परदेशी नागरिकांचा मृत्यू

एकीकडे रशिया आणि युक्रेनमध्ये मागच्या तीन वर्षांपासून सुरू असलेलं युद्ध थांबवून शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे युक्रेन आणि रशियाकडून एकमेकांवर हल्ले सुरूच आहेत. युक्रेनने रशियावर ड्रोनद्वारे हल्ला केल्यानंतर आता  रशियाने युक्रेनवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. रशियाने केलेल्या या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचे तसेच चार परदेशी नागरिकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.

रशियाने युक्रेनमधील ओदेशा बंदरावर गहू भरत असलेल्या एका जहाजावर क्षेपणास्त्रांद्वारे हल्ला केला. या हल्ल्यात चार परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला. तर २ जण जखमी झाले. हा हल्ला काल संध्याकाळी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ओदेशामधील लष्करी अधिकारी ओलेन कायपर यांनी सांगितले की, काल संध्याकाळी करण्यात आलेल्या या हल्ल्यासाठी रशियाकडून बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला. ओदेशा बंदरावर करण्यात आलेल्या हल्ल्यादरम्यान, एक क्षेपणास्त्र बार्बाडोसचा झेंडा असलेल्या एमजे पिनार या जहाजावर आदळले. त्यामुळे या जहाजाचं नुकसान झालं. तसेच या हल्ल्यात चार सिरियाई नागरिक मारले गेले.

दरम्यान, काल सकाळी युक्रेनने रशियावर जोरदार ड्रोन हल्ला केला होता. त्यामुळे रशियाची राजधानी मॉस्कोमधील अनेक इमारतींना आग लागली होती. शहराच्या दिशेने झेपावत असलेले ६० ड्रोन नष्ट करण्यात आल्याची माहिती मॉस्कोचे महापौर सर्गैई सोबयानिन यांनी दिली होती. 

Web Title: Russia Ukrain War: In retaliation for the drone attack, Putin launched a ballistic missile..., setting fire to Ukraine, 4 foreign nationals dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.