शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन चीनला जाणार! युक्रेनशी युद्धानंतर पहिला विदेश दौरा, कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 21:45 IST

Vladimir Putin China Visit: युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाचा दीर्घकाळ सहभाग, दोन बलशाली नेत्यांच्या भेटीकडे देशाचं लक्ष

Vladimir Putin China Visit: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अद्याप पूर्णपणे शमलेले नाही. तशातच आता इस्रायल आणि हमास यांच्यात नवं युद्ध सुरू झालं आहे. या युद्धात तब्बल १६०० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याच दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिनचीन दौऱ्यावर जाणार आहेत. जगातील दोन बलवान नेते एकमेकांची भेट घेणार असताना त्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. रशियाचे पुतिन चीन दौऱ्यावर जाण्याचे नक्की कारण तरी काय, असा सवाल आता केला जात आहे. जाणून घेऊया या दौऱ्यामागे कारण नक्की काय आहे.

बेल्ट अँड रोड इन्फ्रास्ट्रक्चर (बीआरआय) प्रकल्पाला एक दशक पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पुतीन चीनमध्ये जाऊन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या दौऱ्यामध्ये अनेक देशांचे नेते सहभागी होणार आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानेही याला दुजोरा दिला आहे. या अंतर्गत चीन सरकार बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हच्या भागीदारांसोबत पुढील टप्प्यावर चर्चा करण्यासाठी आणि विकासाचे नवे आयाम निर्माण करण्यासाठी बीजिंगमध्ये येणाऱ्या शिष्टमंडळाचे स्वागत करत असल्याचे सांगण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी 130 हून अधिक देशांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे. युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पुतिन यांचा हा पहिलाच चीन दौरा आहे. मॉस्को मीडियाच्या वृत्तानुसार, त्यांच्यासोबत रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव देखील असतील, जे चीनी समकक्ष वांग यी यांच्याशी चर्चा करतील. बीजिंगच्या नेतृत्वाने या उपक्रमाचे कौतुक केले आणि सांगितले की, एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ चायना (एक्झिमबँक) च्या प्रकल्पांसाठी कर्जाची शिल्लक आता एकूण 2.2 ट्रिलियन युआन ($307.4 अब्ज) आहे. युक्रेनसोबतच्या युद्धात रशियाचा दीर्घकाळ सहभाग असल्यामुळे शस्त्रास्त्रांचा तुटवडा आहे. चीन आणि रशिया हे पारंपारिकपणे मैत्रीपूर्ण देश आहेत, त्यामुळे संपूर्ण जग त्याच्या भेटीवर लक्ष ठेवून आहे.

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनchinaचीनrussiaरशियाIndiaभारतRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया