शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

...अन् कॅलिबर क्षेपणास्त्रांनी सुसज्ज रशियन पाणबुडी गेली ब्रिटनच्या युद्धनौकेजवळून; नाटो देशांमध्ये पसरली भीती  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 16:45 IST

आता पाणबुडीची दुरुस्ती काही महिने चालणार असून, ती दुरुस्ती किती काळ चालते हे पाहावं लागणार आहे.  

कॅलिबर क्षेपणास्त्रांनी सुसज्ज रशियाची पाणबुडी इंग्रजी चॅनेलजवळून गेल्यानं ब्रिटनसह नाटो देशांमध्ये  मोठी दहशत पसरली आहे. किलो वर्गाच्या प्रकारातील या पाणबुडीचे नाव क्रास्नोडार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाणबुडी सेंट पीटर्सबर्ग येथे जात आहे, जिथे तिची दुरुस्ती केली जाणार आहे. पाणबुडी गेल्या 15 महिन्यांपासून काळ्या समुद्रामध्ये तैनात होती.काळ्या समुद्रात रशियानं पाणबुडी तैनात केल्यानं बराच काळ वाद सुरू आहे. सीरियातील गृहयुद्धांवर रशिया येथे तैनात असलेल्या पाणबुडीच्या मदतीने नजर ठेवून आहे. क्रास्नोडारने काळे समुद्र सोडल्यानंतर आजूबाजूच्या देशांच्या नौदलातही खळबळ उडाली आहे. लष्करी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आता पाणबुडीची दुरुस्ती काही महिने चालणार असून, ती दुरुस्ती किती काळ चालते हे पाहावं लागणार आहे.  ब्रिटनची युद्धनौका समुद्रात असतानाच रशियन पाणबुडी गेली जवळून तुर्कस्तान इंग्रजी चॅनेलमधून रशियन पाणबुडी गेल्यानं त्याला विरोध करू शकते. पाणबुडी मे 2017मध्येही इंग्रजी चॅनेलमधून गेली होती. सीरियाजवळ तैनात असताना रशियन पाणबुड्यांनी अनेक क्षेपणास्त्रे डागली होती. विशेष म्हणजे ब्रिटनची युद्धनौका एचएमएस टायनी इंग्लिश चॅनेलमधून जात असतानाच रशियन नौदल ही पाणबुडी त्यांच्याजवळून गेली आहे. असे सांगितले जात आहे की, रशियन पाणबुडी आणि एक ब्रिटनची युद्धनौका इंग्रजी चॅनेलमधून जात आहे. रशियन पाणबुडी हळूहळू बाल्टिक समुद्राकडे जात आहे. यापूर्वी ब्रिटिश युद्धनौका टायने रशियन नौदलाच्या आणखी एका तुकडीला एस्कॉर्ट केले होते. त्यात बर्‍याच विध्वंसक युद्धनौकांचा समावेश होता.

विशेष म्हणजे रशियाची सतत आक्रमक वृत्ती आणि चीनच्या संरक्षण सज्जतेमुळे नाटो देशात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. रशियाच्या आक्रमक भूमिकेविरुद्ध आपली तयारी अधिक बळकट करण्याची विनंती नाटो देशांना करण्यात आली आहे.  फ्रान्स, बेल्जियम, लक्जमर्ग, ब्रिटन, नेदरलँड, कनाडा, डेन्मॉर्क, आइसलँड, इटली, नार्वे, पोर्तुगाल आणि संयुक्त राज्य अमेरिका या देशांचा नाटोमध्ये समावेश आहे. रशियाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी नाटो देशांना स्मार्ट, वेगवान, सामूहिक आणि जोरदार कारवाईची आवश्यकता असल्याचा इशाराही एका पॉलिसी पेपरमधून देण्यात आला आहे. 

चीनला पाश्चात्य देशांमध्ये आपला प्रभाव वाढवायचा आहेनाटो देशांना चीनशी संघर्ष टाळण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी काम करण्यास सांगितले आहे. चीनने हाँगकाँगवर कडक कायदे लादले आहेत. चीनला आता पाश्चात्य देशांमध्ये आपला प्रभाव वाढवायचा आहे. माजी संरक्षण सचिव लॉड रॉबर्टसन म्हणाले की, अत्यंत आक्रमक चीन आणि रशिया नवीन धोके निर्माण करीत आहेत. अशा परिस्थितीत नाटोला या अधिक शक्तिशाली होऊन पूर्ण तयारी करण्याची गरज आहे. पेपरात असे म्हटले आहे की, रशिया हा नेहमीच नाटोचा 'शत्रू' राहिला आहे, परंतु चीनचा नवा उदय आणि वाढत्या लष्करी सामर्थ्याने 21व्या शतकात नवीन चिंतांना जन्म दिला आहे. चीन आपला संरक्षण खर्च 6.6 टक्क्यांनी वाढवणार आहे. चीनचे अध्यक्ष सन 2035पर्यंत चीनच्या लष्कराचे आधुनिकीकरण करण्यात गुंतले आहेत. सन 2049 पर्यंत चीनच्या सैन्याला जागतिक दर्जाचे बनविण्याची त्यांची योजना आहे. चीन आणि भारत, जपान यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. ड्रॅगन हिमालयातून दक्षिण चीन समुद्राकडे सरकला असून, तैवान, व्हिएतनामसारख्या छोट्या शेजारील देशांना वारंवार धमकावत आहे. 

हेही वाचा

आक्रमक चीन अन् रशिया तयार करतायत घातक शस्त्र; नाटो देश दहशतीखाली

"गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांपुढे अडचणी अन् बकरी ईदसाठी सुविधांची खैरात'; मनसेचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र

दररोज 3GB डेटा देणारे तीन कंपन्यांचे सर्वात स्वस्त प्लॅन; जाणून घ्या सर्वकाही

"सत्तेसाठी मोदी ताकदवान नेता असल्याची खोटी प्रतिमा पसरवली; आता तीच ठरतेय भारताची दुर्बलता"

भारतीय लष्कराची तयारी पाहून चीन बिथरला; तिबेटमध्ये बनवलं थेट 'उडतं हॉस्पिटल'

सोन्याचे भाव पुन्हा एकदा झाले कमी, असे आहेत आजचे दर

सोन्याची वायदा बाजारातील किंमत कमी झाली; जाणून घ्या...

ग्रामीण बँकांमध्ये 9638 पदांसाठी नोकऱ्यांची खैरात! उद्या संपणार मुदत, असा करा अर्ज

सरकारच्या 'या' योजनेत पाच वर्षांसाठी १ लाख गुंतवल्यावर मिळतोय मोठा लाभ, पैसेही राहणार सुरक्षित

टॅग्स :russiaरशिया